चंद्रपुरात पहिल्यांदाच घडला हा गुन्हा

अवघ्या काही तासात आरोपींना अटक

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे, रामनगर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा छडा 24 तासात लावला. Chandrapur crime news

26 एप्रिलला बाबूपेठ येथील 24 वर्षीय युवक जयदीप दवने हा भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी अकोला जिल्हयात गेला होता, त्यानंतर रात्री 10.30 वाजता जयदीप हा चंद्रपूर मध्ये पोहचला, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात जयदीप पोहचला असता त्याठिकाणी पायदळ बस स्टॉप कडे जात असताना अज्ञात एका महिलेने जयदीप ला अडविले व आमच्या गाडीवर बस म्हणत त्याच्याजवळील रोख रक्कम 8 हजार, मोबाईल चार्जिंग चे साहित्य असा एकूण 9 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल महिला व तिच्यासोबत असलेल्या 3 तरुणांनी लंपास केला. Chandrapur police

या घटनेची तक्रार जयदीप ने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली, रामनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम 392 अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला.

रामनगर गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपी हे रेकॉर्ड वरील तर नाही याबाबत शोध घेतला, रामनगर पोलिसांनी काही रेकॉर्डवरील आरोपीचे फोटो फिर्यादी जयदेव ला दाखविले असता त्याने आरोपीना ओळखले.

त्यांनतर पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली असता आधी एकाला व त्यानंतर 4 आरोपीना अटक केली, आरोपीमध्ये 19 वर्षीय विजय उर्फ पप्पू मनीष शेट्टी, 25 वर्षीय शुभम सुधाकर रामटेके, 19 वर्षीय दीपक राजू भोले रा. चंद्रपूर व एका महिलेला अटक केली.

पोलिसांनी आरोपी जवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन क्रमांक MH31FK2665, रोख रक्कम सहित 54 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लुटमारीच्या या गुन्ह्यात पहिल्यांदाच महिलेचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, विशेष म्हणजे गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात हा गुन्हा उघडकीस आणला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, सतीश अवथरे, विनोद यादव, मिलिंद दोडके, निलेश मुडे, लालू यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी, भावना रामटेके यांनी केली.