चंद्रपुर जिल्ह्यात एका बाजार समितीवर उद्धव ठाकरे गटाचा झेंडा

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्हा बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा धक्कादायक निकाल पुढे आले, 12 बाजार समिती निकालात कांग्रेस 5, भाजप 3, उद्धव ठाकरे गट 1, कांग्रेस-भाजप आघाडी 2, तर कांग्रेस-भाजप-राष्ट्रवादी-मनसे आघाडी 1 बाजी मारली आहे.
रविवारी पार पडलेल्या पोम्भूर्णा, भद्रावती व गोंडपीपरी बाजार समिती निवडणुकीत मतदानांनंतर मतमोजणी सुरू झाली.
 पोम्भूर्ना बाजार समिती मध्ये महाविकास आघाडी ने 12 जागेवर विजय मिळविला तर भाजप ला जागेवर समाधान मानावे लागले. Apmc election results
गोंडपीपरी बाजार समिती निकालात भाजप 18 पैकी 12 तर कांग्रेसला 6 जागेवर विजय मिळविता आला.
तर भद्रावती बाजार समिती येथे उशिरा मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर रवी शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकतर्फी विजय मिळविल्याची माहिती असून त्यांनी 12 जागेवर विजय मिळविला आहे.
भद्रावती बाजार समिती निवडणुकीत खासदार व आमदार धानोरकर यांना वरोरा नंतर इथेही पराभवाचा सामना करावा लागला. Chandrapur apmc election results
भाजपचे दिग्गज नेते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मूल व पोम्भूर्णा बाजार समितीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
गोंडपीपरी बाजार समितीमध्ये अनेक वर्षांपासून कांग्रेसची एकहाती सत्ता होती, त्या सत्तेला भाजपने सुरुंग लावत विजय मिळविला, गोंडपीपरी बाजार समिती मधील पराभव कांग्रेस आमदार सुभाष धोटे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
बाजार समिती निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा क्षेत्रातील मूल व पोम्भूर्ना बाजार समिती मध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर खासदार धानोरकर यांच्या लोकसभा व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या विधानसभा क्षेत्रात पराभवाचा सामना करावा लागला.
यंदाच्या निवडणुकीचे निकाल हे धक्कादायक असून दिग्गजांना त्यांच्या होम ग्राउंडवर विरोधी पक्षाने धूळ चारली आहे.