चंद्रपूरच्या खासदार पुत्राने पैश्याची बचत करीत केले हे कौतुकास्पद कार्य

News34 chandrapur

चंद्रपूर : पालकांकडून मिळणाऱ्या रकमेतून अनेक विद्यार्थी पार्टी किंवा मौज मजा करत असतात. मात्र बारावीच्या मानस या विद्यार्थ्याने स्वखर्चाच्या बचतीतून जमा झालेली रक्कम गरीब, होतकरू आणि दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खर्ची घातली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनवाणी पायाने आलेल्या 60 विद्यार्थांना शुज भेट देऊन त्यांनी समाज सेवेचा अनोखा परिचय दिला आहे. Mp balu dhanorkar

जिवती तालुका हा मागास आणि दुर्गम, नक्षलग्रस्त मानला जातो. या तालुक्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा आपल्या विविध उपक्रमामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. वर्षाचे ३६५ दिवस ही शाळा सुरू असते. या शाळेत येणारे विद्यार्थी गरीब आणि आदिवासी समाजाचे आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अंगावर घालायला कपडे, पायात चप्पल सुद्धा नाही. अशा स्थितीत हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांची ही स्थिती लक्षात घेऊन मानस बाळू धानोरकर यांनी बचतीतून पैशातून जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांसाठी खर्ची घालण्याचा निर्णय घेतला. School shoes

यावेळी मानस यांनी फक्त शूज त्यांच्या स्वाधीन केले नाही तर त्यांना स्वतःच्या हातानी घालून देखील दिले. यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तो देखील गहिवरून गेला.

शाळेतील शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पाहुण्यानी शाळेत प्रवेश करून वर्गाची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पवार, पिट्टीगुडा सरपंच बाबुराव पवार, मुख्याध्यापक विठ्ठल आवारी, सहाय्यक शिक्षक सुरेश पानघाटे, दिलीप कुचनकर, विषय शिक्षक राजेंद्र परतेकी, पोलीस पाटील, गावकरी तसेच पालक यांची उपस्थिती होती.