बसचा भीषण अपघात, 15 जणांचा मृत्यू 25 जखमी

मोठी दुर्घटना

News34 chandrapur

मध्यप्रदेश – श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस मंगळवारी सकाळी 8.30 वाजता दानसागा, डोंगरगाव दरम्यान बोराड नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून खाली पडली.

या अपघातात सुमारे 15 जणांचा मृत्यू तर तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहे. मृतांमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनरचा समावेश आहे. MST हिरामणी ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MP 10 P 7755 ही ओव्हरलोड होती. एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खरगोन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

2 दिवसांपूर्वी केरळ राज्यात डबल डेकर बोट उलटल्याने 21 जणांचा मृत्यू झाला होता.