चंद्रपुरातील शिवसेना पदाधिकाऱ्याचा अन्यायकारक अनुभव

शिवसेना पदाधिकाऱ्यावर ओढवलं संकट

News34 chandrapur

 

चंद्रपुर :- येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी हे मोलमजूरी करुन आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे गोरगरीब रुग्ण आपल्या आजाराचा उपचार करण्याकरीता आले असता त्यांना रुग्णालय सुविधा देण्यास टाळाटाळ व दुर्लक्ष करुन रुग्णाला दाखल न करता खाजगी दवाखान्यात जाण्याचे सांगतात आणि दाखल केलेल्या रुग्णाचा उपचार करताना सुविधा उपलब्ध करून देत नाही. Shivsena eknath shinde

औषधी बाहेरून घ्यावी, नर्स व वॉर्डबॉय रुग्णाकडून पैसाची मागणी करतात न दिल्यास मुजोरी करुन रुग्णाकड़े लक्ष्य देत नसल्याने त्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. तसेच रुग्णालयात प्रत्येक्ष पाहणी केली असता असे दिसून आले की, काही मशीन वारंवार बंद व चालू होत असतात आणि काही मशीन चार चार महिन्यापासून बंद पड़लेली आहेत.

याअगोदर चंद्रपुर शासकीय जिल्हा रुग्णालयात दि. 24 मार्च 2023 रात्री 10 वा. दरम्यान ड्यूटी मेडिकल ऑफीसर डॉक्टर व नर्स यांनी वॉर्ड क्र.11 मधून रेफर केलेल्या श्रीमती लिलाबाई पारखी या अत्यंत गंभीर अवस्थेत असताना देखील महिला रुग्णाला वॉर्ड क्र.03 मध्ये घेण्यास मज्जाव करत कर्त्यव्यात कसूर करुन जीवितास हानि पोहचवण्याऱ्या डॉक्टर व दोन नर्सेवर तात्काळ कायदेशीर कड़क कार्यवाही करावी तसेच अशाप्रकारे आपली जबाबदारी पार न पाडणाऱ्या डॉक्टरांना सक्त ताकीद देण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,चंद्रपुरचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे यांना शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, चंद्रपुर उपशहर प्रमुख अरविंद धीमान, अविनाश उके आदीनी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली. Chandrapur government medical college

त्यामुळे आज आमच्या सारख्या राजकीय पदाधिकाऱ्याची जर ही अवस्था होत असेल, तर सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी जनतेचे काय हाल होत असतील हे यावरून स्पष्ट होते? करीता आपण सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून सखोल चौकशी करुन संबंधित दोषीवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करुन यापुढे भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी व चंद्रपुर उपशहर प्रमुख अरविंद धिमान यांनी नागपुर येथील शिवसेना आढ़ावा बैठकीत खा.श्रीकांत शिंदे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदनातुन केली.