चंद्रपुरातील सार्वजनिक रस्त्यावर सुरू होतं हे अवैध काम

मनपाची कारवाई

News34 chandrapur

चंद्रपूर –  उत्तम नगर बंगाली कॅम्प येथे सार्वजनिक रस्त्यावर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सुरु असलेल्या बोअरवेलचे काम बंद करवुन बोअरवेल करवून घेणारे व  करुन देणारे कंत्राटदार या दोघांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथे मनपामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur municipality

शनिवार दि. १३ मे रोजी मनपा उपद्रव शोध पथकास उत्तम नगर येथे अवैधरीत्या बोअरवेलचे काम सुरु असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पाहणी केली असता खोब्रागडे यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानाजवळ मनपाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर बोरींगचे काम सुरु केले असल्याचे आढळले. Bore well

अवैधरीत्या बोअरवेलचे काम करीत असल्याने सार्वजनीक मालमत्तेस नुकसान करीत असल्याचा ठपका ठेऊन काम बंद करविण्यात आले तसेच  दुकानदार व बोअरवेल करवून देणारे कंत्राटदार या दोघांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

पाण्यासाठी बोअरवेल खोदण्याचे प्रमाण शहरात याआधी मोठ्या प्रमाणात झाले आहे.सातत्याने पाण्याची कमी होणारी पातळी पाहता मनपातर्फे बोअरवेल खणन होऊ नये यादृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत तसेच ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल आहे त्यांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे बंधनकारक केले आहे.ठराविक कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग न केल्यास त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येत आहे. Rain watar harvesting