वाहनात CNG भरतांना काय काळजी घ्यावी?

CNG भरताना नागरिक वाहनांच्या खाली का उतरतात?

News34 chandrapur

बातमी महत्वाची – देशात पेट्रोल व डीझल चे दर वाढत असताना नागरिक EV वाहन व CNG वाहनाला जास्त पसंती दर्शवित आहे.

Cng वाहनाबद्दल आजही नागरिकांना पुरेशी माहिती नाही, वाहनात cng भरताना त्यामध्ये काय अडचणी येतात याबद्दल काही माहिती जाणून घेऊया.

CNG किट कुठून लावावी?

देशात चारचाकी वाहनांमध्ये CNG किट लावायची असल्यास नागरिक बाहेरील मेकॅनिक कडून cng किट लावत असतात, कारण देशात फॅक्टरी फिटेड cng वाहनांचा अभाव आहे.

आफ्टरमार्केट CNG किट असलेल्या वाहनांमध्ये, CAG फिलर नॉब एकतर मागील बूटमध्ये किंवा मधल्या सीटखाली असतो.

तुम्ही ज्या शोरूममधून गाडी खरेदी करतात. त्याच शोरूममधून सीएनजी किट लावा. याचे कारण म्हणजे तुम्ही जर बाहेरून सीएनजी किट लावत असल्याने कंपनीकडून कारच्या इंजिनवर मिळणारी वॉरंटी संपते. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

लोकांना सीएनजी भरण्याचे नॉब कुठे आहे हेच कळत नाही, त्यामुळे रिफिलिंग करताना कोणतीही अडचण येऊ म्हणून लोकांना खाली उतरण्यास सांगितले जाते.

सीएनजी रिफिलिंग घेताना सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले जाते. सीएनजी वाहनात बसवलेल्या टाकीमध्ये खूप जास्त दाबाने साठवले जाते. टाकी रिफिल करताना गळती किंवा स्फोट झाल्यास लोकांना तेथून पळून जाण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांना खाली उतरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CNG विषारी आहे काय?

सीएनजी विषारी नाही, पण त्या वासाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. वाहनांमधील सीएनजी गळतीमुळे लोकांना डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येण्याची शक्यता असते. या समस्या टाळण्यासाठी, रिफिलिंग स्टेशनवर वाहनातून बाहेर उतरणे शहाणपणाचे ठरते.