News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई – आजच्या तरुणाईला ऑनलाइन माध्यमांचे वेड लागले आहे, सोशल मीडियावरील instagram, facebook व youtube चा वापर करीत रिल्स बनविण्याचा नाद तरुणाईला मोठ्या प्रमाणात जडला आहे.
मात्र ह्या नादात तरुणाई अनेक चूका करीत आहे, असाच एक प्रकार उल्हासनगर मधील तरुण, तरुणीने केला आहे, राज्यात मागील काही दिवसांपासून वाढणार तापमान यावर दुचाकीवर तरुण तरुणी ने चालत्या गाडीवर अंघोळ करण्याचा व्हिडीओ तयार केला होता, तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला होता.
तो व्हिडीओ बघून पोलिसांनी दोघांवर चालत्या गाडीवर अंघोळ करीत इतर वाहनचालकांचा अपघात होईल अशी परिस्थिती निर्माण केली, तसेच हेल्मेट परिधान न करता एका हाताने दुचाकी वाहन चालवली असल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
पोलिसांनी दोघांवर काय गुन्हा दाखल केला?
व्हिडिओ व्हायरल होताच उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी ही रील्स तयार करणारा तरुण आदर्श शुक्ला आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादंवि 279 आणि मोटर वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये या दोघांनाही प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
चंद्रपूर शहरातही असाच प्रकार
इन्स्टाग्राम चे वेड चंद्रपुरातील तरुणाईला सुद्धा मोठ्या प्रमाणात लागला असून काही दिवसांपूर्वी चंद्रपुर शहरातील 2 तरुणांनी शहरातील सावरकर चौक, मुख्य बस स्थानक परिसरात चालत्या दुचाकीवर असाच व्हिडीओ तयार केला होता.
मात्र या प्रकाराची चंद्रपुरातील पोलिसांनी दखल घेतली नसल्याने समाजमाध्यमांवर स्वतः व्हायरल होणाऱ्या तरुणाईला अधिक बळ मिळाले आहे.