News34 chandrapur
चंद्रपूर/पोम्भूर्णा :- विद्युत खांब घेऊन जाणारी ट्रॅक्टर
पलटल्याने दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित -भंजारी मार्गांवर घडली.
या घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मिथुन पांडुरंग मडावी, अंकुश राजू गंदेरशीरवार अशी मृतकांची नावे आहेत तर सुभाष रणदिवे, ईश्वर मांडवकर हे दोघे जखमी झाले असून मृतक आणि जखमी मुल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी पोहचत ट्रॅक्टर खाली दबलेल्या दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. गंभीर जखमी असलेल्यांना दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.
ट्रॅक्टर पलटी झाली आणि ते खांब मजुरांच्या अंगावर कोसळले
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने, मजुरवर्ग सकाळीचं कामे आटोपत आहे, यामुळे ट्रॅक्टर वर मजूर सिमेंट चे खांब घेऊन निघाले होते, मात्र वाटेतच ट्रॅक्टर पलटी झाल्याने सिमेंटचे खांब मजुरांच्या अंगावर कोसळले.
अन तिघांचे प्राण वाचले…
ज्यावेळी अपघात झाला त्यावेळेस मृतक आणि जखमी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बसले होते. विनोद मराठे , गुरुदेव रामदास सातरे हे दोघे ट्रॅक्टर चालक आशिष निकोडे याचा बाजूला बसले होते. त्यामुळे हे तिघे बचावले.विशेष म्हणजे जड वाहतूक या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर प्लेटच नव्हती. पोलीस विभागाचा दुर्लक्षामुळे शेती कामासाठी घेतलेल्या बहुतांश ट्रॅक्टर जड वाहतूक करतात. यामुळे अशा घटना घडत असल्याचे आता बोलले जात आहे.