News34 chandrapur
चंद्रपूर/तळोधी – नागभीड तालुक्यातील व तळोधी (बा.) जवळील बोकोडोड नदीच्या पुलावर रात्री ११:३० च्या दरम्यान झालेल्या अपघातात मुलगा साहिल रमाकांत कड्यालवार (३०) व आई कल्पना रमाकांत कड्यालवार (५२) यांचा मृत्यू झाला. तर वडील रमाकांत पांडुरंग कड्यालवार (६२) हे गंभीर जख्मी झाले.
सिंदेवाही-लोनवाही येथील त्रिवेणी नगरात राहणारे रमाकांत कड्यालवार यांच्या गाडीला 20 मे ला रात्रौ ११;३० च्या सुमारास तळोधी-बाळापुर जवळील बोकोडोह नदीवर विचित्र अपघात झाला.
असा झाला अपघात
नागपूर वरून सिंदेवाही कडे रात्री मुलाला बुलेट बाईक घेऊन दिल्यानंतर दुचाकी ने मुलगा साहील व त्याच्यामागे आई व बाबा चारचाकी वाहनाने गावाकडे जात होते. काही वेळानंतर अचानक बोकोडोह पुलावर मुलाची बुलेट बंद पडल्यामुळे रमाकांत यांनी आपली चारचाकी वाहन बुलेट मागे थांबविले असता दुचाकीला काय झाले ते बघत होते.
मात्र त्यावेळी बेभान मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने पुलावर ऊभ्या असलेल्या चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली त्या धडकेत बुलेटवर बसून असलेला त्यांचा लहान मुलगा साहील रमाकांत कड्यालवार (३०) व त्यांच्या पत्नी कल्पना रमाकांत कड्यालवार (५२) यांच्या गाडीला जोरदार धडक बसल्याने ते पुलावरून खाली पडले, पुलावरून दोघे खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील रमाकांत हे गंभीर जखमी झाले.
ते वाहन अवैध रेती वाहतूक करणारे?
या घटनेची माहिती मिळताचं नागभीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरवते घटनास्थळी दाखल झाले, घटनेचस पंचनामा करीत मृतक व जखमी यांना रुग्णालयात पाठविण्यात आले.
विशेष म्हणजे सिंदेवाही तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात नागपूरला व नागपूर परिसरात रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक सुरू असून हे अवैध वाहतूक करणारे ट्रक/टिप्पर चालक है बेधुंद अवस्थेत टिप्पर पळवतात त्यामुळे या रस्त्यावर रात्री च्या वेळी मोठ्या प्रमाणात या अवैध वाहतूक करणारे ट्रक टिप्पर मुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. याकडे रस्ता वाहतूक व अपघात नियंत्रण विभागाने लक्ष देऊन यावर नियंत्रण आनायला पाहीजे.