15 वर्षाची साथ सुटली, माझा मोठा भाऊ गेला – संदीप गिर्हे शिवसेना जिल्हाप्रमुख

माझा मोठा भाऊ गेला

News34 chandrapur

चंद्रपूर – बाळू भाऊ आपल्याला सोडून गेले, हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला, राजकारणात त्यांनी माझ्या मोठ्या भावाची भूमिका निभावली, त्यांच्या जाण्याने आज मला एकटं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी NEWS34 सोबत बोलताना दिली.

राज्यातील कांग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले, ते चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार होते.

धानोरकर हे आधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते, त्या काळात संदीप गिर्हे यांनी धानोरकर सोबतच काम केले होते, शिवसेनेत असताना धानोरकर हे आक्रमक राजकारणी म्हणून ओळखले जात होते, कांग्रेस पक्षात आल्यावर ते खासदार झाले मात्र त्यांचा स्वभाव मात्र बदलला नाही.

चंद्रपूर जिल्हा पोरका झाला, खासदार धानोरकर यांचं निधन

मतदार असो की आपले लोक त्यांच काम ते आवर्जून करीत होते, आम्ही 15 वर्षे सोबत काम केले, बाळू भाऊ हे माझे मोठे भाऊ होते, कांग्रेस पक्षात गेल्यावर सुद्धा ते माझ्याशी नेहमी संपर्कात असायचे.

मात्र 30 मे ला त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला विश्वास बसला नाही, डोळ्यात अश्रू आले, आज पोरकं झाल्यासारखं वाटत आहे, एक राजकारणी व मोठा भाऊ म्हणून बाळू भाऊ माझ्या नेहमी स्मरणात राहणार…

धानोरकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची हिम्मत द्या अशी प्रार्थना मी करतो.