News34 chandrapur
आज एका क्षुल्लकशा कारणावरून धीरज तेलंग या तरुणाला अजय सरकार आणि त्याच्या गुंडांनी मारहाण केली. तक्रारदार धीरज तेलंग याच्या म्हणण्यानुसार सकाळी 11.30 च्या सुमारास धीरज तेलंग यांचा भाऊ दुचाकीने जात असताना एका ऑटो वाल्या सोबत टक्कर झाली आणि त्यात धीरज तेलंग याचा भाऊ जखमी झाला. यादरम्यान ऑटो चालक आणि त्याच्यात काही बाचाबाची झाली ही गोष्ट धीरज तेलंग याला समजतात तो आपल्याला आपल्या भावाला घेऊन मेडिकलमध्ये गेला बापट नगर येथील मेडिकल जवळ असताना अचानक अजय सरकार आणि त्याचे गुंड तिथे आले आणि त्याने मुझे पहचानता नही क्या असं म्हणत अश्लील शिवीगाळ करत थेट धीरज तेलंग वर हल्ला चढवला मारहाण रोखण्यासाठी जाणाऱ्या दुसऱ्या युवकाला देखील बेदम चोप देण्यात आला या संदर्भात धीरज तेलंग याने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.