चंद्रपुरातील काष्ठ पूजन शोभायात्रेत प्रसिद्ध देवस्थान तिरुपती मधून येणार 15 हजार लाडूंचा प्रसाद

News34 chandrapur

चंद्रपूर – अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे. मंदिरातील महाद्वारसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठाची निवड तज्ञ मंडळींनी केली होती.

 

त्या अनुषंगाने चिराण सागवान लाकडांची विविध आकारात तयार केलेली 1855 घन फूटची पहिली खेप बल्लारपूर येथील वन विकास महामंडळाच्या आगारात सोमवार 27 मार्चला पोहचली अशी माहिती वन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार यांनी बोलतांना दिली आहे. Ram mandir ayodhya
अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड आणि मे. लार्सन अँड ट्युब्रो लि. या कंपनीमध्ये सुमारे 1855 घन फूट चिराण सागवान लाकडाचा पुरवठा करण्यासाठी रूपये 1, 31, 31,850/- चा दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी विक्री करार करण्यात आलेला होता. श्री राम मंदिर उभारणीचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे FDCM कडून अधिक सागवान लाकूड पुरवठा केला जाणार आहे. Teak wood from Chandrapur will go to Ayodhya
त्यानुसार फारेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड यांच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय आरागिरणी, आलापल्ली व बल्लारशाह येथे मागणीनुसार चिराण सागवान माल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी अयोध्या राममंदीर ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच वास्तुविशारद चमू यांनी शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे भेट देऊन पुरवठा करण्याकरीता चिराण सागवान लाकडाचा आकार आणि गुणवत्ता निश्चित केली होती. हे विशेष.
 
बल्लारशाह सागाचे वैशिष्ट्य
 
बल्लारशाह सागवान लाकडात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने उच्च शक्ती, जास्त टिकाऊपणा आणि कीटक आणि वाळवी प्रतिकारक. फिनिशिंगनंतर तेलाचे प्रमाण जास्त असल्याने लाकडाची शायनिंग अतिशय सुंदर आणि आकर्षक असते.
 
29 मार्चला विधिवत पूजन करून हे काष्ठ शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्या रवाना होणार आहे.
याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत बल्लारपूर ते चंद्रपूर पर्यंत निघणाऱ्या शोभयात्रेची सविस्तर माहिती दिली.
29 मार्च ला सायंकाळी 4 वाजता निघणाऱ्या शोभायात्रेत 1 हजार 946 कलावंतांची उपस्थिती राहणार असून सर्व कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण या शोभायात्रेत करणार आहे.
राम मंदिरात चंद्रपूरच्या सागवान लाकडाच्या माध्यमातून द्वार, महाद्वार व गर्भ गृहातील दार निर्माण करण्यात येणार आहे.
नेपाळ मधून शीला तर राजस्थान मधून स्तंभासाठी लागणारा दगड अयोध्येला जाणार आहे.
बल्लारपूर मधून निघणारी शोभायात्रा चंद्रपुरातील महाकाली मंदिर येथे पोहचल्यावर सागवान काष्ठ ची पूजा करण्यात येणार त्यानंतर चांदा क्लब ग्राउंड येथे शोभयात्रेचे विसर्जन करीत त्याठिकाणी प्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
 

सदर कार्यक्रमात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेश चे उच्च तंत्र शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय, बनारस चे पालकमंत्री रवींद्र जयस्वाल, रामायण धारावाहिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहीरी यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात प्रसिद्ध तिरुपती तिर्थक्षेत्रातून आलेल्या 15 हजार लाडूंचा महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे.
आयोजित कार्यक्रमात राम भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.