News34 chandrapur
चंद्रपूर – जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतजी सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती व महिलांना आपल्या दैनंदिन जीवनात आणि बाहेर जगासमोर व्यवस्थितपणे प्रदर्शित होण्यासाठी तसेच मेकअप आर्टिस्ट होणे हा करिअरचा भाग म्हणून सुद्धा बघता येते हे याला भरपूर स्कोप सुद्धा आहे, आजच्या प्रॅक्टिकल जिवणाची गरज आहे ती लक्षात घेऊनच युवासेना युवती उपजिल्हाप्रमुख सौ.रोहिणी विक्रांत पाटील यांनी या सेमिनारचे आयोजन केले.
Employment opportunities in makeup business
या सेमिनारला प्रमुख पाहुणे म्हणून भरपूर प्रोत्साहन देत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. उज्वलाताई नलगे व जिजा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.मनस्वीताई संदीप गिर्हे यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
सोबतच शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख कुसुमताई उदार, नीलिमाताई शिरे, वर्षाताई राऊत, बल्लारशा विधानसभा युवासेना युवती उपजिल्हाप्रमुख विपश्यना मेश्राम, शहर चिटणीस धनश्री हेडाऊ, शाखाप्रमुख संतुष्टी बुटले, हिमानी मेश्राम ,कोमल चापले, आरती समुद्रलवार, नम्रता लोहिते, निर्मलाताई पंडित ,भाग्यश्री खनके ही युवती सेनेची टीम उपस्थित होती. अनेक महिलांनी व युवतींनी या सेमिनारचा लाभ घेतला.