खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणीत उपस्थितांचे डोळे पाणावले

आमदार धानोरकर यांनी सांगितला तो प्रसंग

News34 chandrapur

चंद्रपूर – राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेच्या वतीने १४ जून रोजी दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केल्या गेली. स्थानिक प्रियदर्शीनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित लोकनेत्याला श्रद्धांजली वाहू या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार धानोरकर यांना अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करीत खासदार धानोरकर यांच्याबद्दलचे अनुभव सांगितले, अनुभव सांगताना काही जण अश्रूंच्या सागरात बुडाले होते.

 

कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी खासदार धानोरकर यांच्या संपूर्ण बालपण ते राजकीय कारकीर्दीवर चित्रफीत दाखविण्यात आली, चित्रफीत बघत असताना अनेकांचे डोळे पाणावून गेले होते.

श्रद्धांजली कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी खासदार धानोरकर सोबतचा 18 वर्षाचा प्रवासाबाबत अनेक प्रसंग सांगितले, त्यामध्ये खासदार धानोरकर हे नेहमी म्हणायचे मला 60 ते 70 वर्ष जगायचं नाही, आयुष्य असं जगायचं की जाताना बाळू धानोरकर कोण होता हे नागरिकांनी कायम लक्षात ठेवायला हवं.

मी जेव्हा या जगातून जाणार तेव्हा माझ्यावर प्रेम करणारा वर्ग किती आहे हे सर्वांना कळेल डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत असताना आमदार धानोरकर यांनी विविध प्रसंग नागरिकापुढे व्यक्त केले.

26 मे ला खासदार धानोरकर यांच्या पोटात दुखू लागले, त्यांना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याचवेळी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, 28 मे ला वडिलांचे निधन झाले, त्यानंतर खासदार धानोरकर यांची प्रकृती ढासळली, त्यांना तात्काळ नागपुरातून air ambulance ने दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना 30 मे ला रात्री अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

आता खासदार धानोरकर यांनी जे स्वप्न बघितलं होत ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे, आज माझ्या लेकरांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरविलं, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आम्हाला सावरायला वेळ लागेल.

आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, यंग चांदा बिग्रेड, शेतकरी संघटना, जनविकास सेना, मनसे, विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस, उलगुलान संघटना, अ.भा. रिपब्लिकन पक्ष, इको प्रो, सर्वोदय शिक्षण मंडळ, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर प्रेस क्लब, श्रमिक पत्रकार संघ, साई ग्रुप आफ इंन्स्टीटयुट, सोमय्या ग्रुप, फिमेल एज्युकेश सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, लोकमान्य टिळक स्मारक समिती, जिल्हा बार असोसिएशन, एमआयडीसी असोसिएशन, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, भूमिपुत्र बिग्रेड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, फेडरेशन आॅफ टे्ड कामर्स असोसिएशन, अखिल भारतीय सरपंच संघटना, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, फेडरेशन आॅफ टेड कामर्स असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी मंडळ, बहुजन मेडिको असोसिएशन, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अखिल भारतीय सरपंच संघटना, इंटक आदी संघटना , राजकीय पक्षांचा समावेश आहे. या श्रद्धांजली सभेला सर्वपक्षीय नेत्यांसोबत धानोरकर कुटुंबीय उपस्थित होते.