चंद्रपूर युवासेनेचा आदित्य महोत्सव उत्साहात संपन्न

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात विविध कार्यक्रम

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा (चंद्रपूर, बल्लारपूर ,राजुरा विधानसभा) दिनांक 13 जून 2023 रोजी युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा (चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा विधानसभा ) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवा सेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, चंद्रपूर जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आले.

 

चंद्रपूर विधानसभा येथे युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी रिजवान पठाण, शहरी युवा अधिकारी शिवा वझरकर, शहर युवा अधिकारी शाहबाज शेख यांच्या नेतृत्वात महाकाली कॉलरी येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

वर्ग दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शील्ड व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

युवासेना व युवती सेना उपजिल्हा युवती अधिकारी सौ.रोहिणी विक्रांत पाटिल यांच्या नेतृत्वात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वांढरी फाटा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. घुगुस येथे युवा सेना शहर युवा अधिकारी चेतन बोबडे यांचे नेतृत्वात वृक्षारोपण व प्लास्टिक घनकचरा निर्मूलन असे उपक्रम घेण्यात आले.

बल्लारपूर येथे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश भाऊ पाठक शहर प्रमुख बाबासाहेब युवा सेना तालुका अधिकारी नीरज यादव, युवा सेना शहर अधिकारी अनिकेत बेलखोडे, शहर समन्वयक सोनू श्रीवास यांनी बल्लारपूर येथील सरकारी रुग्णालयात फळ वाटप केले व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

युवा सेना तालुका अधिकारी अभिषेक बद्दल वार व युवा सेना शहर अधिकारी महेश गिरीवार यांच्या नेतृत्वात पोभूंर्ना येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

युवासेना तालुका समन्वयक नागेश कडूकर यांच्या नेतृत्वात दुर्गापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले. मुल,मालेगाव येथे युवा सेना तालुका अधिकारी रितिक संगमवार व इशू अमर ऐलानी यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

राजुरा विधानसभा येथे युवा सेना कडून दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, गोंडपीपरी येथे युवा सेना तालुका अधिकारी तुकाराम सातपुते यांचे नेतृत्वात मूकबधिर शाळा व ग्रामीण रुग्णालयात फळवाटप व वृक्षारोपण करण्यात आले, ज्योती येथे दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.