चुकीने सीसीटीव्ही बंद झाला आणि चंद्रपुरात घडला हा धक्कादायक प्रकार

अज्ञात चोरट्याने 13 हजार रुपयांची रोकड पळविली

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बगीच्यामध्ये अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक साठी येत असतात मात्र या बगिच्यात चोरीचे प्रकार आता वाढू लागले आहे. Azad garden chandrapur

16 जूनला सकाळी गाडीच्या डिक्कीतून 13 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने पळविल्याची धक्कादायक बाब आज उघडकीस आली.

सकाळी नेहमीप्रमाणे मीनाक्षी अलोने यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक MH34BY5523 पार्किंग मध्ये ठेवली त्यांनतर जवळ असलेल्या पैश्याची बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली मात्र परत आल्यावर ती बॅग अज्ञाताने चोरल्याचे लक्षात आले.
त्यानंतर मीनाक्षी अलोने यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

विशेष म्हणजे सकाळी 6.30 ते 7.30 वाजेदरम्यान जेव्हा ही बाब उघडकीस आली त्यावेळी नागरिकांनी बगीच्यामधील असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी सीसीटीव्ही बंद होते.

घडलेल्या या प्रकारावर बगीच्यात येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत बगीच्यात येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आता रामभरोसे असल्याचे सांगत त्याचे संपूर्ण खापर कंत्राटदारावर फोडले आहे.

याबाबत NEWS34 बगीच्याचे काम बघणारे व्यवस्थापक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली..

शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बगिच्याचे कंत्राट नागपुरातील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे, या बगीच्याचे संपूर्ण कामकाज चंद्रपुरातील संकेत चिंचेकर हे बघतात.

आजच्या घडलेल्या प्रकाराबद्दल संकेत सोबत सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की बगीच्यात असे प्रकार जेव्हा घडले त्यावेळी आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतो, मात्र रात्र पाळीत असलेल्या सुरक्षा रक्षकाने घरी जात असताना चुकीने बगीच्या बाहेरील असलेले स्विच ऑफ केले त्यामुळे सीसीटीव्ही बंद झाले होते.

भावाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी बहीण व वडिलांनी महाविद्यालय गाठलं, पण काळ त्यांची वाट बघत होता…

 

याबाबत आम्ही सुद्धा चौकशी करीत आहो, बगीच्यात येणाऱ्या नागरिकांसोबत असे प्रकार घडून नये, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर असतो, मात्र आजची घटना घडायला नको होती, याबाबत आम्ही पोलीस व अलोने ताई सोबत असून त्या चोराला पकडण्यासाठी आम्ही सहकार्य करणार अशी माहिती व्यवस्थापक चिंचेकर यांनी News34 सोबत बोलताना दिली.

आता तो चोर त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असेल याबाबत शंका नाही, चंद्रपूर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.