विदर्भ ट्रॅव्हल्स वर दगडफेक करीत लुटण्याचा प्रयत्न

ट्रॅव्हल्स वर दगडफेक करीत लुटण्याचा प्रयत्न

News34 chandrapur

चंद्रपूर/नागपूर – नागपूर ते मुंबई ला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर आजपर्यंत शेकडो अपघातात असंख्य नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, मात्र आता रात्रीचा प्रवास किती धोकादायक असू शकतो ते रात्री घडलेल्या एका प्रसंगाने पुढे आले आहे.

18 जून ला रात्री 12.30 वाजता नागपूर वरून मुंबई ला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स वर दगडफेक करीत 7 ते 8 जणांच्या टोळक्याने ट्रॅव्हल्स लुटण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनचालकांच्या सतर्कतेने त्या टोळक्याचा प्रयत्न फसला, मात्र या दगडफेकीत 1 नागरिक जखमी झाला आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात तर नित्याचीच बाब झाली असून आता रात्री या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांवर दगडफेक करीत लुटण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे, मुंबई च्या दिशेने जात असलेली विदर्भ ट्रॅव्हल्स जेव्हा वाशीम जिल्ह्यातील कारंजा जवळील ढाकली किनखेड परिसरातून जात असताना चोरट्यानी बसवर दगडफेक करायला सुरुवात केली, या दगडफेकीत वाहनांच्या काचा फुटल्या, या दगडफेकीत 5 ते 7 प्रवासी जखमी झाले असून यवतमाळ जिल्ह्यातील दयाराम राठोड हे गंभीर जखमी झाले.

मात्र वाहनचालकाने सतर्कता दाखवीत बस कारंजा टोल नाक्याजवळ आणली त्यामुळे लुटमारीचा प्रयत्न फसला, या संदर्भात कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.