SNDT महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील प्रवेश प्रक्रिया सुरू

प्रवेश प्रक्रिया सुरू

News34 chandrapur

चंद्रपूर : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई चे कॅम्पस चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे नव्याने सुरू झाले आहे. नुकतेच येथील अभ्यासक्रमांचा शुभारंभ राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत पार पडला.
(alt="sndt university chandrapur")
Sndt विद्यापीठ बल्लारपूर येथील प्रवेश प्रक्रिया सुरू
येथील सहा अभ्यासक्रमांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
बल्लारपूर व चंद्रपूर परिसरातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून विद्यापीठाचे केंद्र बल्लारपूर येथील नेताजी सुभाष चंद्र बोस डिजिटल शाळा, गोरक्षण वॉर्ड येथे सुरू झाले आहे. उत्तम पायाभूत सुविधा उभारून दर्जेदार शिक्षण देता यावे हा विद्यापीठाचा हेतू आहे.
प्रवेश सुरू झालेल्या अभ्यासक्रमांची नावे.
व्यावसायीक व वनसंपदांचा अभ्यास करून बल्लारपूर कॅम्पससाठी विशेष अभ्यासक्रम निवडले आहेत. त्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सेमिस्टर व क्रेडीट पद्धतीवर आधारित चार वर्षीय बीएमस-मार्केटींग मॅनेजमेंट (BMS), बीएमएस- प्रॉडक्ट अॅण्ड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट(BMS), बीएमएस- हॉस्पिटल administration (BMS), बी.व्होक-फुड टेक्नॉलॉजी, तसेच बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (BCA) हा तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
यासोबतच कौशल्य विकासावर आधारित अल्पकालिन अभ्यासक्रमांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यात ट्रॅव्हल अॅण्ड टुरिजम, न्यू मिडीया, कम्युनिकेशन स्किल्स, बेकरी टेक्नॉलॉजी, फ्रुट अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग आणि योगा परिचय अश्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन…
येथील प्रवेश प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन आहे. याकरिता जिल्ह्यातील काही MKCL केंद्रावर जाऊन आपण प्रवेश करू शकता किंवा विद्यापीठाच्या बल्लारपूर येथील महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलात भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करू शकता.
विद्यापीठाच्या sndt.digitaluniversity.ac या वेबसाईट वर जाऊन सुद्धा आपण आपला प्रवेश करू शकता. ३० जून पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे तात्काळ आजच आपला प्रवेश निश्चित करावे. प्रवेशाकरिता काही अडचण उद्भवल्यास 95955 87156, 9370715143 या क्रमांकावर संपर्क करू शकता. असे आवाहन महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर चे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी केले आहे.
दर्जेदार सुविधा असलेले कॅम्पस
नेताजी सभाषचंद्र बोस डिजिटल शाळा, गोरक्षण वॉर्ड, बल्लारपूर येथील SNDT महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलात दर्जेदार साधन सुविधा निर्माण केलेल्या आहेत. विद्यार्थिनींना चांगले शिक्षण मिळावे हा यामागचा हेतू. अत्याधुनिक साधन सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यात उच्च दर्जाच्या डिजिटल बोर्डसह वर्गखोल्या, संगणक प्रशिक्षण वर्ग, प्राचार्यांचे कार्यालय, बैठक सभागृह, प्राध्यापकांसाठी कक्ष इत्यादी सुविधांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थिनींकरिता क्रीडांगणही विकसित करण्यात आले आहे.