News34 chandrapur
चंद्रपूर/ब्रह्मपुरी :– जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ब्रम्हपुरी शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने ब्रम्हपुरी बंदचे हे आवाहन केले होते. आणि त्याला सामान्य नागरिकांनी भरघोस पाठिंबा दर्शविला. हा बंद यशस्वी करण्यासाठी सकाळी ८ वाजता बाईक रॅली काढण्यात आली आणि छत्रपती शिवाजी चौक येथे धरणे आंदोलन देखील करण्यात आले.

गेल्या ४० वर्षांपासून ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी करण्यात येत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर पासून ब्रम्हपुरीचे अंतर १३० किलोमीटर आहे, सोबतच ब्रम्हपुरी येथे सर्व पायाभूत सुविधा असल्याने स्वतंत्र जिल्हा निर्मितीची मागणी रेटण्यात येत आहे.
चंद्रपुरात पोलिसाने केलं असं काही की…त्याला पोलिसांनी केली अटक
1982 ला गडचिरोली जिल्हा घोषित झाला त्याच्या आदल्या दिवशी ब्रह्मपुरी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता मात्र निव्वळ राजकारणामुळे त्यावेळी गडचिरोली जिल्हा घोषित झाला, आज ब्रह्मपुरी तालुक्यापासून 8 ते 9 तालुके 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे.
आज ब्रह्मपुरी ला शिक्षणाचं माहेरघर म्हणून संबोधल्या जाते, मध्यठिकानी असलेल्या ब्रह्मपुरी शहरात शासकीय दृष्टिकोनातून सर्व सुविधा उपलब्ध आहे, शासनाने आमच्या मागणीची दखल ब्रह्मपुरी ला जिल्हा घोषित करावा अशी मागणी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण समितीतर्फे माजी आमदार अतुल देशकर यांनी केली आहे.
जिल्ह्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंद ला नागरिकांनी प्रतिसाद देत 100 टक्के बंद पाडला.