चंद्रपूर शहरात मोबाईल स्नॅचिंग चा प्रकार उघडकीस

अवघ्या 2 तासात आरोपींना अटक

News34 chandrapur

चंद्रपूर – चैन स्नॅचिंग नंतर चंद्रपूर शहरात मोबाईल स्नॅचिंग चा प्रकार समोर आला आहे, 3 जुलै ला सदर प्रकार महाकाली मंदिर मार्गावर घडला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तात्काळ आरोपीना अटक करण्यात आली.

 

3 जुलै ला सकाळी 10 ते 10.30 वाजताच्या सुमारास महाकाली कॉलरी येथील आनंद नगर परिसरात राहणारे रोहित कोमदंडीवार हे गौतम नगर परिसरातून महाकाली मंदिर च्या मार्गावर मोबाईल फोनवर बोलत जात होता.

 

काही वेळात दुचाकी वाहनांवर मागील बाजूने आलेल्या 2 युवकांनी रोहित चा मोबाईल हिसकावीत पळ काढला, रोहित ने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तो यशस्वी झाला नाही, त्याने तात्काळ चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविली.

 

चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास हाती घेत त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता आरोपी त्यामध्ये पोलिसांना स्पष्ट दिसले, दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार होते, पोलिसांनी माहिती काढत आरोपी तन्वीर कदिर बेग व शिवम उर्फ कट्या अनिल कुळकेलवार रा. भिवापूर वार्ड यांना गुन्ह्याचा अवघ्या 2 तासानंतर अटक केली.

 

दोन्ही आरोपिकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत 70 हजार व चोरी केलेला vivo कंपनीचा मोबाईल किंमत 10 हजार असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख मंगेश भोंगळे, पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडित, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, प्रमोद डोंगरे, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, खुशाल कावळे व रुपेश रणदिवे यांनी पार पाडली.