संजय गांधी निराधार योजनेच्या मुल तालुका अध्यक्षपदी वंदना आगरकाटे

आगरकाटे यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन

News34 chandrapur

मुल – गरीब व निराधार सर्वसामान्य नागरिकांचा एकमेव आधार असलेल्या शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या मुल तालुका अध्यक्ष पदी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासू व भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस गडीसूरला येथील ग्रामीण भागातील भाजपच्या निष्ठावान सक्रिय कार्यकर्त्या सौ.वंदना गिरीश आगरकाटे यांची निवड झाली असून यापूर्वीही त्यांचे कार्यकाळात तालुक्यातील अनेक निराधारांना आधार देण्याचे काम त्यांचे हातून घडले आहे.

रेती तस्करांची पत्रकाराला धमकी

 

समितीच्या सदस्य पदी माजी सभापती पूजा डोहणे, उर्मिला कडस्कर,मुन्ना कोटगले, सरपंच नितीन गुरनुले, अनुप नेरलवार ,संजय बोंकुलवार,दिलीप पाल, युवा कार्यकर्ते राकेश ठाकरे, माजी नगरसेवक नामदेव कावळे, यांची निवड करण्यात आली. ही निवड राज्याचे वने सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्षा वंदना आगरकाटे व सर्व सदस्यांचे अभिनंदन होत असून आपल्या निवडीबद्दल सुधीर भाऊंचे आभार मानले आहे.

एकाच दिवशी 6 घरफोड्या, चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई