राज्याच्या अर्थमंत्री पदी मुनगंटीवार?

चर्चा सुरू

News34

चंद्रपूर/मुंबई – राज्याच्या राजकारणात सर्व समीकरणे उलथापालथ होत असून शिवसेना-भाजप युतीला नवा सहकारी राष्ट्रवादी कांग्रेस मिळाला, महाविकास आघाडीमधील महत्वाचे नेते व आमदार सेना भाजप सोबत मंत्रिमंडळात सामील झाले.

चंद्रपूर ट्रॅव्हल्स धारकांसोबत जिल्हाधिकारी यांची महत्वाची बैठक

अजित पवार यांना अर्थ मंत्रालय हवं यासाठी त्यांचा तगादा सुरू आहे, मात्र पवार यांना अर्थ मंत्रालय न मिळावे यासाठी सेना दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती आहे.

चंद्रपुरात महिलेची हत्या

विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद रिकामे झाल्यावर कांग्रेसमधून हे पद विजय वडेट्टीवार यांना मिळणार अशी चर्चा सुरू आहे, या चर्चेत आता सुधीर मुनगंटीवार यांचं नाव पुढे आले आहे.

अर्थ मंत्रालय पुन्हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मिळणार अशी माहिती मिळाली आहे, सेनेच्या आमदारांची नाराजी न ओढवता हे पद मुनगंटीवार यांच्याकडे जाऊ शकते.

वर्ष 2014 ला अर्थमंत्री पदी मुनगंटीवार यांची वर्णी लागली होती, आता पुन्हा हे पद मुनगंटीवार यांच्याकडे जाणार अशी माहिती आहे कारण दिल्लीत होत असलेल्या GST काँसिलच्या 50 व्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री जायला हवे मात्र देवेंद्र फडणवीस हे त्या बैठकीला गेले नसल्याने त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार गेले आहे.

मुनगंटीवार हे बैठकीला हजर झाल्याने त्यांना अर्थ मंत्रालयाची चाबी मिळणार अशी चर्चा सुरू आहे, अर्थ मंत्रालयाच्या घोडदौडीत पवार व मुनगंटीवार यांची नावे पुढे आली असून दोघांतील वॉर कोण जिंकणार हे येत्या काही दिवसात माहीत पडणार.