चंद्रपुरात 2 भावी अभियंत्यांचा अपघातात मृत्यू

धक्कादायक घटना

News34 accident

भद्रावती – तालुक्यातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर असलेल्या घोडपेठ जवळ शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागले मोठे घबाड

मृतक तरुण हे इंजिअरिंग चे प्रथम वर्षातील विद्यार्थी होते, विशेष म्हणजे दोघे युवक चांगले मित्र देखील होते.

यश दिनकर देवाळकर (19) रा. कवठाळा, ता. कोरपना व करण सुधाकर जुलमे (19) रा. म्हातारदेवी (घुग्घुस) ता. चंद्रपूर अशी मृतक विद्यार्थ्यांची नावे आहेत. मृतक दुचाकीस्वार हे भद्रावती तालुक्यातील लोणारा येथे असलेल्या साई इंजिनिअरिंग कॉलेज येथील बी. टेक. प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते.

राज्यात कोयता गॅंग नंतर आता चंद्रपुर जिल्ह्यात शटर गॅंग सक्रिय

शुक्रवारी सकाळच्या सुमारास दोघेही दुचाकी क्रमांक एमएच 29 बीएन 2242 ने कॉलेजला जात होते. यावेळी उर्जाग्राम व घोडपेठ दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंप नजीक असतांना त्याच रस्त्यावरून पेट्रोल भरण्याकरिता पंपाच्या दिशेने रिव्हर्स येत असलेल्या टाटा झेस्ट क्रमांक एमएच 34 एएम 6390 या वाहनाला दुचाकीने धडक दिली. यात दोनही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिस करीत आहेत. CSTPS ची फसवणूक, 32 जणांवर गुन्हे दाखल