News34
चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांसोबत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.
शेगाव येथील मनीष श्रीरामे, धीरज झाडें, चेतन मांदाडे व गिरोला येथील संकेत मोडक असे मृतक युवकांची नावे आहेत. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक सहकार्यकरीत सांत्वन केले.
याप्रसंगी राजूभाऊ चिकटे माजी सभापती कृ ऊ बा वरोरा, मिलींद भोयर तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी वरोरा, निलेश भालेराव योगेश खामनकर, यशवंत लोडे, प्रभाकर घोडमारे, दिवाकर मेश्राम, दिवाकर निखाडे, शंकर घोडमारे, पुरुषोत्तम निखाडे, प्रफुल वाढई ग्रा.प सदस्य शेगाव व इ कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी युवक फिरायला जात असतात. परंतु त्यांनी पावसाचा आनंद घेत असतांना अधिक जोखिमेचे पाऊल उचलू नये. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले