News34
चंद्रपूर/ जिल्ह्यात 2 दिवस दडी मारून असलेल्या पावसाने आज अचानक जोर पकडला, दुपारच्या सुमारास भीषण वादळी वाऱ्याचा पाऊस आला, मात्र या वादळी पावसाने वीज पडून 4 महिला व 2 पुरुषांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे सुरेश आनंदे यांच्या शेतात आज भात लावणीचे काम सुरू होते.
चंद्रपूर जिल्ह्यात संतापजनक घटना
काम सुरू असताना अचानक विजेचा गडगडाट होऊ लागला त्याचवेळी अचानक शेतात भात रोवणीचे काम करणाऱ्या शेत मजुरांवर वीज कोसळली यामध्ये देलनवाडी येथील 45 वर्षीय कल्पना प्रकाश झोडे, 47 वर्षीय अंजना रुपचंद पूसतोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर 33 वर्षीय सुनीता सुरेश आनंदे या जखमी झाल्या.
ब्रह्मपुरी तालुक्यातील बेताळा येथे शेतातील काम आटोपून घरी परत असतांना 35 वर्षीय गीता पुरुषोत्तम ढोंगे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, मृतक महिला ही शेतमजूर होती.
गोंडपीपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनमजुर 56 वर्षीय भारत लिंगु टेकाम हे जंगलात वृक्षारोपण करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोरपना तालुक्यातील खैरगाव सावलहिरा येथील 25 वर्षीय शेतकरी पुरुषोत्तम परचाके शेतात फवारणी करीत असताना अचानक विजेचा गडगडाट होऊ लागल्याने त्याच्या अंगावर वीज कोसळली, या घटनेत परचाके यांचा जागीच मृत्यू झाला.
पोम्भूर्णा तालुक्यातील वेळवा माल येथे शेतात रोवणी करीत असताना 28 वर्षीय अर्चना मोहन मडावी यांच्या अंगावर वीज कोसळली यामध्ये मडावी यांचा जागीच मृत्यू झाला तर शेतात काम करीत असलेले शेतमजूर 31 वर्षीय खुशाल विनोद ठाकरे, 45 वर्षीय रेखा अरविंद सोनटक्के, 22 वर्षीय राधिका राहुल भंडारे, 45 सुनंदा नरेंद्र इंगोले, 40 वर्षा बिजा सोयाम, 55 रेखा ढकलू कुलमेथे हे जखमी झाले.
नागभीड तालुक्यातील नांदेड येथे शेतात काम करीत असताना 17 वर्षीय शाफिया सिराजुल शेख ही वीज पडल्यामुळे जखमी झाली आहे.
25 जुलै रोजी अंगावर वीज पडून मृत्यू
गोंडपीपरी तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथे 25 जुलै रोजी भात रोवणी व शेतात खत टाकत असताना वीज कोसळली यामध्ये शेतात काम करणाऱ्या 35 वर्षीय योगिता प्रकाश खोब्रागडे यांचा जागीच मृत्यू झाला.
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
29 जुलै पर्यँत चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे, त्या कारणाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयाना 27 जुलै ला सुट्टी जाहीर केली आहे.
शहरातील पाणीपुरवठा बंद
आज झालेल्या मुसळधार पावसाने इराई धरण परिसरात अनेक झाडे कोसळल्याने त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून 2 दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद असणार अशी माहिती मनपा तर्फे देण्यात आली आहे.