चोवीस तासातील दुसरी घटना, नातेवाहिकांना घातपाताचा संशय,
एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील तोडसा येथील अमित डोलू तिम्मा, (वय २३) या युवकांचा त्याच डुम्मे नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदरच्या ठिकाणी चोवीस तासातील दुसरी घटना असून, अमितच्या मृत्यू घातपातातून झाला की काय? अशी शंका नातेवाहिकांनी घेतली आहे.
चोवीस तासांपूर्वीच मरपल्ली येथील अक्षय कुळयेटी या तरुणांचा याच नाल्याच्या पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला होता, सदरची घटना ताजीच असतांना त्याच ठिकाणी पाण्यात बुडून अमित तिम्मा या युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमित तिम्मा हा (ता.०९ जुलै) मंगळवारी सकाळपासून घरून एटापल्लीला जातो असे सांगून गेला होता, आज (ता.१० जुलै) बुधवारी सकाळी सात वाजता दरम्यान मरपल्ली येथील पादचारी नागरिकांना अमितचा मृतदेह शेजारच्या नाल्याच्या पाण्यात तरंगतांना आढळून आला, नागरिकांनी सदरच्या घटनेची माहिती अमित तिम्मा याचे नातेवाहिक व पोलिसांना दिली, माहितीवरून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अमितचा मृतदेहावर उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे,
रुग्णालयात अपुरे वैद्यकीय अधिकारी असल्याने मृतकाची उत्तरीय तपासणी करण्यास दिरंगाई होत आहे, यावर भाजपचे तालुका अध्यक्ष प्रशांत आत्राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा सक्षम करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे, घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.