पोलीस कामगिरीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५१ लाख रुपयांची शाब्बासकी,
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्यातील जारावंडी पोलीस स्टेशन हद्दीतील ओंडोळी गावा जंगल परिसरात पोलीस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत बारा नक्षली ठार तर एका पोलीस उपनिरीक्षकांसह एक पोलीस जवान जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे, पोलीसांच्या कामगिरीवर खुष होऊन व त्यांचे धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना शाब्बासकी देऊन ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
(ता. १७ जुलै) बुधवारी सकाळी दहा वाजता पोलिसांना आंडोळी गाव शिवारात बारा ते पंधरा नक्षलवादी वास्तव्यात असल्याची माहिती गुप्त हेरांकडून मिळाली होती, त्याआधारे गडचिरोली पोलिसांनी तीव्र नक्षल विरोधी मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेचे नेतृत्व जिल्हा नक्षल विरोधी मोहिमेचे अपर पोलीस अधीक्षक यतिष देशमुख यांनी केले आहे, त्यांनी सी-६० पथकांला छत्तीसगड राज्य सीमा भागातील वांडोली गावात तैनात केले. त्यावेळी परिसरात दुपारी दोन वाजता दरम्यान नक्षल्यांकडून पोलिसांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू आला होता, पोलिसांनी सावध पवित्रा घेत प्रतिउत्तरा दाखल गोळीबारा केला, सदरची चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सहा तासांहून अधिक काळ सुरू होती. त्यानंतर परिसरात केलेल्या शोध मोहिमेत १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यावेळी तीन ए के ४७, २ इंसास, एक कार्बाइन, एक एसएलआर यासह सात ऑटोमोटिव्ह असा नक्षलयांच्या वापराचा शस्त्रसाठा पोलिसांनी हस्तगत करण्यात आली आहे.
मृतकांपैकी एका नक्षलवाद्याची ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी डीव्हीसीएम लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम असल्याची माहिती मिळाली आहे. अन्य नक्षलवाद्यांची ओळख पटविली जात आहे. चकमकीनंतर परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविली जात आहे.
सहा तास चाललेल्या या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक आणि सी-६० पथकातील एक जवानाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ उपचारार्थ हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
जिल्हा दौऱ्यावर राज्याचे चार बडे मंत्री असताना राज्य सीमा भागात गोळीबार होणे हे विशेष!
वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या वडलापेठ येथे स्टील प्रकलाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते. एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे छत्तीसगड सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. त्यात गडचिरोली पोलीस दलाला फार मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान अहेरी तालुक्यातील वडलापेठा स्टील प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरच्या यशस्वी व मोठ्या अभियानासाठी सी-६० कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.