चौथा दिवस, चौदा मुख्य मार्गांची वाहतूक ठप्प, पुरामुळे शेकडो गावे संपर्काच्या बाहेर!

जिल्हाधिकारी दैनी यांनी दिल्या प्रभावी गावांना भेटी!

गडचिरोली;
जिल्ह्याच्या अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. नदी व नाले पुराच्या पाण्याने दुथळी भरून वाहत असल्याचा फटका राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या वाहतुकीला बसला असून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रहदारीच्या चौदा मुख्य मार्गावर पोलिसांना तैनात करून वाहतूक बंद केली आहे.

जिल्हाधिकारी संजय दैनी यांनी (ता.२० जुलै) शनिवारी धोधो पडणाऱ्या पावसात आरमोरी, कुंभी, चांदाळा, वळसा व कुरखेडा या पूर प्रभावी भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणे केली, यावेळी आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेला सतर्कतेने नदी व नाल्यांच्या पूरस्थितीवर नजर ठेवण्याचे व नागरिकांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत, भेटी दरम्यान पूर पीडित महिला, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधून अनावश्यक प्रवास करणे टाळण्याचे व आवश्यक कोणताही प्रवास करतांना स्थानिक प्रशासनाची मदत घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दैनी यांनी पूर प्रभावी क्षेत्राच्या नागरिकांना केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीवरून (ता.१७ जुलै) बुधवारी सकाळी पासून सुरू झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने अनेक छोट्या, मोठ्या नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुरातुन प्रवास करताना जीवित हाणीचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून चौदा रहदारी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली गेली आहे. रहदारी वाहतूक बंद ठेवण्यात आलेल्या मार्गात प्रामुख्याने कुडकेली गावाजवळील चंद्रा नाल्याला पूर आल्याने आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग, वाट्रा नाल्याला पूर आल्याने अहेरी मोयाबिनपेठा रस्ता, कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता, आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग गोलांकर्जी ते रेपनपल्ली रस्ता, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी ते छत्तीसगड राज्यसिमा भागातील धानोरा ते कुरखेडा, पोर्ला, वडधा रस्ता, वैरागड जोगीसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता, कुरखेडा ते वैरागड रस्ता, करवाफा ते पोटेगाव रस्ता, मालेवाडा ते खोब्रामेंढा रस्ता, गोठनगाव ते सोनसूरी रस्ता, वडसा, नवरगाव, आंधळी, चिखली रस्ता, लखमापूर बोरी, गणपुर हळदीमाल रस्ता, पर्ल कोटा नदीच्या पुरामुळे भामरागड ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग अशा मार्गांचा समावेश आहे. सदरची रहदारी वाहतूक बंद होऊन चोवीस तासांपेक्षा जास्त कालावधी झाला असून पाऊस थांबून पूर ओसरे पर्यंत ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातीन सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, कोरची, कुरखेडा, धानोरा व अहेरी या तालुक्यातील दोनशेहून अधिक गावे जगाच्या संपर्काच्या बाहेर गेली आहेत,

अशा पूर प्रभावित गावांमधील नागरिकांना आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी व जीवनावश्यक साहित्य मिळणे दुरापास्त झाले असून गरोदर माता, लहान बालके व वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्याचा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापणाद्वारे पूर पीडित गावांतील नागरिकांसाठी जीवनावश्यक साहित्य पुरवठ्याची मदत पोचविण्याचे आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने दुथळी भरून वाहणाऱ्या नद्या व नाल्यांच्या परिसरातील गाव व शहरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगून धोकादायक प्रवास करण्याचे टाळावे तसेच रहिवासी वस्तीत पुराचे पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाल्यास प्रशासनाच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी वास्तव्य ठिकाण हळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैनी यांनी केले आहे.