पोलीस प्रशासन हिंसाचार विरोधात दोनहात करण्यास सज्ज,
गडचिरोली;
जिल्ह्याच्या दक्षिण भागासह उत्तरेकडील काही भागात नक्षल संघटनेकडून दरवर्षी २८ जुलै ते ०२ ऑगस्ट दरम्यान शहीद सप्ताह पाळला जातो, यावेळी चळवळ स्थापनेपासून हिंसक व घातपाताच्या कारवाया करतांना ठार झालेल्या नक्षल्यांना हुतात्मा मानून आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम नक्षल प्रभावी क्षेत्रात आयोजन करण्याची परंपरा गेली अठठवीस वर्षापासून सुरु आहे. दरम्यान नक्षल्यांकडून घातपाती कारवाया घडवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जाते, त्यामुळे हिंसाचार व घातपाती कारवाया रोखण्यासाठी पोलीस प्रशासनही सतर्कतेने नक्षल्यांशी दोनहात करण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे,
नक्षली संघटनेचा संस्थापक नेता चारु मुजुमदार व चळवळीतील इतर नक्षल्यांच्या हत्यांच्या स्मृति प्रीत्यर्थ २८ जुलै ते ०२ ऑगस्ट शहीद सप्ताह दरम्यान नक्षल चळवळीकडून प्रभावी क्षेत्रात पत्रके व ब्यानर प्रशिद्ध करून वाहतूक व काम बंद ठेऊन सप्ताह साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते, पोलीस कारवाही व चकमकीत ठार झालेल्या सहकारी नक्षल्यांच्या नावे दुर्गम भागातील गांव जंगल परिसरात स्मारकांची उभारणी करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध जनप्रबोधनात्मक व सांस्कृतिक कला व नृत्य कार्यक्रमाची मांदियाळी एक आठवाडाभर सुरु असते, नक्षली दहशतीमुळे अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा, कुरखेडा, मुलचेरा व कोरची अशा नक्षल प्रभावी तालुक्यातील अनेक भागातील वाहतूक प्रभावित होत असून कंत्राटदार शासकीय विकास कामे तर शेतकरी, शेतमजूर आपली शेती कामे बंद ठेवतात, सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन व वाहतूक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बससेवा, शासकीय अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे विकासात्मक दौरे, खासगी वाहतूक, सामान्य नागरिकांची वर्दळ अशी सगळी कामे नक्षल्यांच्या शहीद सप्ताह दरम्यान बंद ठेवली जातात,
नक्षल्यांकडून शहीद सप्ताह साजरा करण्यापूर्वी नक्षल चळवळीच्या रडारवरील शासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्ष, संघटना पुढारी, पोलीस ख़बरी व शासकीय विकास कामे करणारे कंत्राटदार, यांना लक्ष्य करून हत्या करण्याचे कट कारस्थान केले गेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घातपाताच्यां घटनांची राज्य शासन व पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन प्रभावी क्षेत्रात नक्षल्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात येते, तसेच शासनाकडून पोलीस भरतीच्या वेळी स्थानिक युवकांना प्राधान्याने पोलिसांत भरती केले गेले आहे. त्यामुळे नक्षल्याची पाळेमुळांची जाण असणाऱ्या आदिवासी समाजातील पोलीस जवानांनी नक्षल चळवळ ठेचून काढली आहे. दक्षिण गडचिरोली जिल्ह्याचा अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यात नक्षली हालचाली व हिंसक कारवाया थोपविण्यासाठी शासनाने एटापल्ली, जारावंडी, कसनसुर, गट्टा व हेडरी असे पाच पोलीस स्टेशन व दोन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत सुरजागड, कोटमी, हालेवारा, बुर्गी, आलदंडी, हेडरी, वांगेतुरी, गर्देवाडा व अहेरी तालुक्यातील येलचिल येथे पोलीस मदत केंद्रे तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्थळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करून नक्षल हिंसाचार विरोधी मोहीम तिव्र केली आहे,
त्यामुळे पोलीस प्रशासनाला फार मोठे यश प्राप्त झाले असून गेल्या सात वर्षात नक्षल चळवळीतील नर्मदाक्का सारख्या बलाढ्य नेत्यांना अटक तर साईनाथ, मिलिंद तेलतुंबडे, जोगन्नाचा खात्मा व पहादसिंग, गिरीधर सारख्यांचे आत्मसपर्पण करून घेण्यात पोलीस प्रशासन मोठी सफलता प्राप्त झाली आहे, त्यामुळे नक्षल चळवळीला पोलिसांनी वारंवार हादरे देऊन खिळखिळी केली असून नक्षली कारवाया नियंत्रणात आल्याचे बोलल्या जात आहे,