जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवेलीचे विद्यार्थी रोवणीला,

शिक्षण सप्ताह कृती कार्यक्रमांतर्गत स्तुत्य उपक्रम,

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत २२ ते २८ जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला आहे, दरम्यान मुख्याध्यापक श्रीनिवास पुल्लूरवार व सहाय्यक शिक्षिका एन पी देवतळे यांच्या पुथकाराने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेऊन शेत शिवारात जाऊन भात रोवणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहात आनंदाने सहभाग घेऊन रोवणी केली.

पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवेलीकडून नेहमीच विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. सदरच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्याचे धोरण असून शिक्षण तंत्रज्ञान, झाडे लावणे व संवर्धन करणे, सामूहिक भोजनदान, प्रत्यक्ष क्षेत्र भेट देऊन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. मुख्याध्यापक श्रीनिवास पुल्लूरवार, शिक्षिका एन पी देवतळे, यांनी कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा, वृक्ष लागवड, वाचनलेखन स्पर्धा व विविध खेळ, तसेच ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने शेती उपक्रम माहिती मिळण्यासाठी भात पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक शेत शिवारात जाऊन अवगत करून घेतले आहे, .

यावेळी सरपंच कैलास उसेंडी, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाकर आत्राम, कार्तिक तंलाडे, गणेश वड्डे, अनिता आत्राम, सतिश मेश्राम, आरती, अर्चना, आरुषी, दिव्या महिमा, किष्णा, सम्राट, आंशिक, आवनी, समिक्षा इत्यादी पदाधिकारी, पालक व विद्यार्थी कृतिशील कार्यक्रमांतर्गत रोवणी उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.