पश्चिम बस्तर कमेटी सचिव मोहन याने मागीतली जनतेची माफी,
गडचिरोली;
जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्याच्या नक्षल चळवळीचा पश्चिम विभाग सचिव मोहन याने एका प्रसिद्धी पत्रकातून कारपोरेटीकरण व सैनिकीकरणाच्या माध्यमातून आदिवासींचा जल, जंगल, जमीनीचा हक्क हिरावून त्यांना विस्थापित करण्याचा डाव रोखण्यासाठी तसेच जनतेची संपत्ती सुरक्षित राखण्यासाठी नक्षल चळवळीकडून उद्योगपतींची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांविरुद्ध जनयुद्ध पुकारले आहे. अशावेळी काही चुका होऊन दोन निरपराध्यांचा जीव गेल्याची कबुली देऊन ही बाब जनतेने समजून घेऊन माफ करावे असे मोहन याने पत्रातून म्हटले आहे.
गेल्या महिन्यात नक्षल्यांकडून घडविण्यात आलेल्या दोन विविध घटनेतील बॉम्ब स्फोटात दोन सामान्य नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला होता, त्यामुळे (ता.१० ऑगस्ट) शनिवारी मोहन याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मुदवेण्डी, कावाड़ गावात नवीन पोलीस कॅम्प स्थापन करून पोलिसांच्या अभियानामुळे आदिवासी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. २७ जुलै २०२४ ला मुदवेण्डी गावातील हिड़मा वामन कोवासी (१०वर्ष) या बालकाचा, पीएलजीए द्वारा घडवून आणलेल्या प्रेशार बॉम्ब स्फोटात जखमी होऊन मृत्यू झाला होता, त्यापूर्वी गेल्या महिन्यात गड़िया कुंजाम याचा मृत्यू झाला आहे. या घटनांचा पश्चिम बस्तर विभागीय कमेटीकडून दुःख व्यक्त करून मृतकांच्या सर्व आप्तेष्ट व नातेवाहिकांचा नक्षल चळवळ माफी मागत असल्याचे नमूद केले आहे. जंगल आणि जंगली मार्गात काही दिवस ये जा करून नये, पोलिसांना लक्ष करून प्रेसर बॉम्ब ठेवलेले आहेत. अशा सूचना नागरिकांना पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मीकडून करण्यात आली होत्या, नागरिकांचे नुकसान करण्याचे धोरण पीएलजीए धोरण नाही. काही उद्योजक मीडिया आणि पेपरमध्ये मोठा अफवा पसरवून नक्षल चळवळीला बदनाम केले जात असल्याचे पत्रकातून म्हटले आहे.
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार द्वारे आपरेशन कगारच्या नावाने मूलनिवासी आदिवासींना पीड़िया, इत्तावार, नेण्ड्रा, कोरचोली, टेकामेट्टा सारख्या हत्या आणि खोट्या चकमकीमध्ये केवळ बस्तर जिल्ह्यात ऐंशी पेक्षा जास्त निर्दोष आदिवासींची हत्या केल्या असल्याचा आरोप पत्रकातून केला आहे. झालेल्या हत्यांची संपूर्ण जबाबदारी ब्राम्हणी हिन्दूत्ववादी भाजपा सरकारची आहे. निर्दोष आदिवासी आईड्डी बॉम्बच्या प्रभाव क्षेत्रात आल्याने ते मारल्या गेले आहेत,
शेवटी प्रसिद्धी पत्रकातून स्थानिक पत्रकारांना उद्देशून पश्चिम बस्तर विभाग कमेटी (माओवादी) चा सचिव मोहन याने निरपराध पोलिसांकडून खोट्या चकमकी घडवून निरपराध आदिवासींच्या केल्या जाणाऱ्या हत्यांचे सत्य देश व जगापुढे आणल्या जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. एकाच दिवसात दक्षिण गडचिरोली विभागाचा प्रवक्ता श्रीनिवास याने लोहखनिज प्रकल्प विरोधातील मजकूराचे व छत्तीसगड राज्याच्या बस्तर जिल्ह्याचा विभागीय सचिव मोहन याने जनतेला उद्देशून माफीनामा पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे गडचिरोली व बस्तर या दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांकडून महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य सीमावर्ती भागात नक्षल विरोधी शोध अभियान तीव्र करण्यात आले आहे.