विविध शैक्षणिक उपक्रमातून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा,

जवेलीच्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतून शैक्षणिक जनजागृती.

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील जवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजनातून जनजागृती करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सरपंच कैलास उसेंडी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून (ता.१५ ऑगस्ट) गुरुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवेलीचे मुख्याध्यापक श्रीनिवास पुल्लूरवार व सहाय्यक शिक्षिका निर्मला देवतळे यांच्या कल्पकतेतून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश वड्डे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडा भक्तीपर प्रतिज्ञा, तंबाकु मुक्त प्रतिज्ञा, निपुण भारत प्रतिज्ञा, रांगोळी कला प्रात्यक्षिक, शैक्षणिक व गुणात्मक विकासाचे मार्गदर्शन, पहिले पाऊल स्टार्स प्रकल्प शाळा पुर्व तयारी अभियान अंतर्गत लीडर मतांचे कौतुक व सत्कार करण्यात आला, गावातून भ्रमण करून प्रभात फेरीच्या माध्यमातून शिक्षण, व्यसन मुक्ती व देशभक्तीपर जनजागृती करून स्वातंत्र्य दिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

सादर शाळेच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी पोलीस पाटील मनोहर उसेंडी, अंगणवाडी सेविका अनिता आत्राम, पपिता मेश्राम, गोपिका वेलादी, पंचफुला कांदो, कार्तिक तलांडे, बिरसु कांदो, राकेश नरोटी, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.