निष्कलंक, निष्पाप, इमानदार कुत्र्याचे वाचले प्राण! ड्रायव्हरच्या समयसूचकतेने अनर्थ टळला?
सांगली;
महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या शासकीय वाहनाचा विश्रामबाग येथील गव्हर्मेंट कॉलनी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयुक्त गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्त्यावर अचानक आलेल्या एका भटक्या कुत्र्याला वाचवताना ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या बाजूला विद्युत खांबावर धडकले, ड्रायव्हरच्या समयसूचकतेने निष्कलंक, निष्पाप, इमानदार कुत्र्याचे मात्र प्राण वाचले!
सदरच्या वाहनात इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. वाहनाने रस्त्याच्याकडेला असलेल्या विद्युत खांबाला धडक बसल्यानंतर वाहनातील सर्वच एअर बॅग खुल्या झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आयुक्त शुभम गुप्ता हे त्यांच्या शासकीय वाहनातून (ता.०२ ऑक्टोंबर) बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बाहेर जाण्यास निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील अन्य सदस्य आणि चालक होते.
आयएएस शुभम गुप्ता हे दीड वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून कर्तृत्वावर होते, त्यांनी आदिवासींना मिळणाऱ्या गायी, म्हशी, वराह व इतर शासकीय लाभाच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर कारवाहीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. राज्यात आयएएस पूजा खेडकर प्रकरण गाजत असतांनाच गुप्ता यांचा भ्रष्टाचार उघड झाला होता, त्यामुळे देशातील संपूर्ण आयएएस कॅडरमध्ये मोठी खळबळ उडाली होती, गुप्ता यांचे विरुद्ध केंद्र शासन काय कारवाही करते याकडे जनतेचे लक्ष आहे.
शुभम गुप्ता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन,विश्रामबाग परिसरातील गव्हर्मेंट कॉलनी येथील रस्त्यावरून शासकीय वापरातील वाहनाने जात असतांना, अचानक रस्त्यात एक भटका कुत्रा वाहनाच्या आडवा आला होता. त्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्याकडेला असलेल्या विद्युत खांबाला वाहन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की गाडीची उजवी बाजू पूर्ण चक्काचूर झाली आहे. यावेळी वाहनात सर्व एअर बॅग खुल्या झाल्या होत्या. अपघातात आयुक्त गुप्तांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ड्रायव्हरच्या समयसूचकतेने निष्कलंक, निष्पाप, इमानदार कुत्र्याचे प्राण वाचले, हे विशेष!