माजी उपसरपंच अभय पुण्यमूर्तीवार यांचे अपघाती निधन,

दीड महिन्यापूर्वी वडिलांचे निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच परिवारावर दुसरा दुःखाचा आघात,

एटापल्ली; (गडचिरोली)
येथील माजी उपसरपंच पापा उर्फ अभय वसंतराव पुण्यमुर्तीवार (वय ४५) यांचे स्वतःच्या दुचाकीवरून कोसळून झालेल्या अपघाताने चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःखद निधन झाले आहे.

पापा उर्फ अभय पुण्यमुर्तीवार हे (ता. १० जानेवारी) शुक्रवारी एटापल्ली वरून तोडसा गावाकडे जातांना दोन किमी अंतरावरील एकरा फाट्याजवळ त्यांचे स्वतःच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात होऊन ते खाली कोसळले होता, सदरची माहिती त्यांनी स्वतः नातेवाहिकांना फोन करून अपघाताची सांगितली होती. माहितीवरून नातेवाहिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, अपघातात त्यांच्या छातीच्या खालच्या बरगळीला जबर गुप्त मार लागल्या खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते, यावेळी त्यांना झालेले दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, गेली तीन दिवसांपासून उपचार सुरू असतानाच (ता. १३) सोमवारी पहाटे तीन वाजता दरम्यान पुण्यमूर्तीवार यांची प्राणजोत मावळली, त्यांच्या अकाली व दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून सामाजिक कार्यात अग्रेसर व मनमिळावू स्वभावाचे पापा पुण्यमूर्तीवार यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पापा पुण्यमूर्तीवार यांचे वडील वसंतराव पुण्यमूर्तीवार यांचे दीड महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले आहे, वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच मुलाचे अपघाती निधना झाल्याने पुण्यमूर्तीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पापा यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यविधी (ता. १३) सोमवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान वन विभाग तपासणी नाका जवळील डुम्मे नाला मोक्षधाम घाटावर केल्या जाणार आहे. घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जाणार आहे.