संस्कार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे कर्तृत्व व संविधान जागरातून गाजविला मंच!
एटापल्ली;(गडचिरोली)
येथील तालुका प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित कला व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धात्मक सादरीकरणातून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. नृत्य व कला स्पर्धांमध्ये संस्कार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनगौरव गाथेतून उपस्थितांचे मने जिंकली, दमदार सादरीकरणातून मंच गाजवत हे विद्यार्थी प्रथम परितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. सदरची शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
तालुक्यात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करून जनजागृतीपर कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तहसील कार्यालय पटांगणात उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले, नगरपंचायत मध्ये अध्यक्षा दिपयंती पेंदाम यांच्या हस्ते, पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांच्या हस्ते, तसेच विविध कार्यालय, शाळा महाविद्यालयात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन नगरपंचायत अध्यक्षा दिपयंती पेंदाम यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांनी भूषविले होते, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार हेमंत गांगुर्डे, नायब तहसीलदार अनिल भांडेकर, गट विकास अधिकारी आदिनाथ आंधळे, गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे, नगरपंचायत उपाध्यक्ष मीना नागुलवार, बांधकाम सभापती, राघवेंद्र सुल्वावार, पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी, महिला व बालकल्याण सभापती जानो गावडे, नगरसेवक निजान पेंदाम, किसान हिचामी, तारा गावडे, कविता रावलकर, रेखा मोहुर्ले, निर्मला गावडे, सरिता हिचामी, निर्मला कोंडबत्तुनवार, बिर्जु तिम्मा, जितेंद्र टीकले, राहुल कुळमेथे, शालिनी करमरकर, दीपक सोनटक्के, मनोहर बोरकर, नगरपंचायत प्रशासक अधिकारी शिवाजी रसाळ कनिष्ठ अभियंता विवेक साखरे, भगवंतराव महाविद्यालय प्राचार्य शामराव बूटे, संस्कार पब्लिक स्कुलचे प्राचार्य विजय सुंकेपाकवार, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्राचार्य पौर्णिमा शिंपी, राजीव गांधी हायस्कुल प्राचार्य श्रीकांत कोकुलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते,
यावेळी संस्कार पब्लिक स्कुल, जिल्हा परिषद हायस्कुल, मदार लँड इंग्लिश मिडीयम स्कुल, राजीव गांधी हायस्कुल, कस्तुरबा गांधी विद्यालय, राजमाता राजकुवर विद्यालय व भगवंतराव विद्यालय अशा शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, व्यसन मुक्ती, शिक्षण, आरोग्य, व नागरी समस्यांना उजाळा देणारे तसेच स्वातंत्र्य, गणतंत्र, थोर पुरुष, महात्मा व वीर योध्यानच्या गाथांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवंतराव हायस्कुलचे शिक्षक राजीक शेख व कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका सरोज कुळमेथे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश मुकेरवार यांनी केले, यावेळी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शाळा महाविद्यायलायचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,