गेली काही काळापासून कावीळ या आजाराने ग्रस्त होते,
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्यातील डुम्मे या गावचे प्रतिष्ठित नागरिक राजे विश्वेशराव महाराज आत्राम स्थापित नाग विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ते लालु लेबडुजी पुंगाटी (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
लालू पुंगाटी यांना गेली काही काळापूर्वी कावीळ हा आजार झाला होता, नातेवाहिकांनी त्यांचे प्रकृतीवर वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय तसेच आयुर्वेदिक उपचार घेतले, मात्र त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही, (ता. १० फेब्रुवारी) सोमवारी रात्री दहा वाजता दरम्यान राहते घरी त्यांचे दुःखद निधन झाले. लालू पुंगाटी हे राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते, त्यामुळे डुम्मे गाव व परिसरात आदिवासी व इतर पारंपरिक रहिवासी समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या निधनाने आदिवासी समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता हरवल्याचे दुःख सर्वत्र व्यक्त केल्या जात आहे.
लालू पुंगाटी यांच्या मृत्यू पश्चात त्यांना पत्नी, दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यविधी (ता. ११) मंगळवारी दुपारी तीन वाजता दरम्यान डुम्मे येथील स्मशानभूमीत केला जाणार आहे.