बुद्धगया महाबोधीविहार ताब्यासाठी वसंतराव कुलसंगे यांचे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण!

उपोषणाला भारतीय बौद्ध महासभा व सामाजिक संघटनांचा पाठींबा!

गडचिरोली;
येथील इंदिरा गांधी चौकात वीर बाबुराव शेडमाके यांच्या १९२ व्या जयंतीदिन (दि.१२ मार्च) बुधवारी शहीद वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव कुलसंगे यांनी बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात मागणीसाठी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले आहे.

बुद्धगया या भूमीत तथागत गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली होती. त्यामुळे सम्राट अशोकाने तथागताचा बुद्ध धम्म स्वीकारून धम्म प्रचार व प्रसारासाठी बुद्धगयाचे महाबोधी बुद्ध विहार बांधले होते. आज हे बुद्ध विहार संपूर्णरीत्या बुद्धांच्या ताब्यात नसून ते बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी देश, विदेशातून बौद्ध धम्मीय नागरिक आणि भिक्खूनी बुद्धगया येथे शांततामय मार्गाने आंदोलन उभारून उपोषण सुरू केले आहे. मात्र बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात शासनकडून कोणतीही भूमिका घेतली जातांना दिसून येत नाही.

भारतीय बौद्ध महासभा व सामाजिक संगठनांच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविली आहे. यावेळी बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत, सरचिटणीस प्रा. गौतम डांगे, कोषाध्यक्ष लहू रामटेके, सचिव लहूकुमार रामटेके, बाळकृष्ण बांबोळे, संविधान फाउंडेशनचे समन्वयक गौतम मेश्राम, सिद्धार्थ खोब्रागडे, गौतम दुर्गे, रामदास टिपले, प्रबुद्ध बुद्ध विहार समितीचे अमरकुमार खंडारे, शांतीलाल लाडे, अविनाश तुरे, सुखदेव वासनिक, बामसेफ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे प्रमोद राऊत, भोजराज काणेकर, मुनिश्वर बोरकर, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदीप भैसारे, बसपा जिल्हाध्यक्ष भाष्कर मेश्राम, सुधीर वालदे, ऋषी रामटेके, राहुल वनकर, सुमन कराडे, कविता वैद्य, मधुकर भगत, ज्ञानोदय वाळके, सचिन गेडाम, भीमराव शेंडे, डोमाजी गेडाम सुमित्रा राऊत, नजरिका मशाखेत्री, अर्चना भैसारे, शशीकला सहारे,यशोधरा जांभुळकर, शीतल भैसारे, दमयंती सहारे,शीतल सहारे, ज्योती उराडे, तालुका अध्यक्ष एम एन वनकर, ,प्रेमदास रामटेके उपोषण स्थळी भेट देऊन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद महादेव मेश्राम यांचे हस्ते उपोषण कर्ते वसंतराव कुलसंगे यांना सायंकाळी लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.

यावेळी वसंतराव कुलसंगे यांनी राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके आदिवासी विकास प्रबोधन समिती भारतीय बौद्ध महासभा, संविधान फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले आहे.