चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडवर

Chandrapur LCB In action mode

News34 chandrapur

चंद्रपूर – देशातील लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट, मात्र या खेळांवर आज मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस कारवाई करण्यास सज्ज झाले आहे.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या अवैध जुगारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून त्या आदेशावर पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी कंबर कसली असून जिल्ह्यात कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे.
2 दिवसांपूर्वी शहरातील तुकुम परिसरात लाईव्ह मॅच दरम्यान हारजित चा खेळ सुरू होता, महेश कोंडावार यांनी आपल्या पथकासह क्रिकेट सट्ट्यात सहभागी आरोपीना अटक केली.
त्यानंतर पुन्हा या अवैध जुगारावर विविध ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने धाडी मारल्या.
शहरातील पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत MH34 पान ठेला चालक जुगल हिरालाल लोया हा हैद्राबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामना दरम्यान पैसे लावत मोबाईलवर संभाषण करीत कागदावर आकडे लिहत होता, त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने धाड मारीत जुगल लोया ला अटक केली, मात्र एक आरोपी पारस उकाड हा तिथून पसार झाला, आरोपिकडून 12 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करीत पुढील तपास पडोली पोलिसांकडे वर्ग केला.
दुसऱ्या व तिसऱ्या कारवाईत चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रयतवारी कॉलरी येथे लाईव्ह मॅच दरम्यान सिद्धार्थ कुरमी हा पैसे लावत हारजित चा खेळ खेळत होता, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करीत 17 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 भद्रावती येथील चारगाव या गावात मंगेश दुरुडकर हा सुद्धा लाईव्ह मॅच दरम्यान पैसे लावत असताना पोलिसांनी धाड मारली, आरोपिकडून तब्बल 63 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिन्ही कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने 3 आरोपीना अटक करीत तब्बल 93 हजार 370 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन करीत आहे.
Ipl सुरू होताच चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार हे कारवाई करण्यासाठी सक्रिय झाले असून ते सतत कारवाई करीत आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मंगेश भोयर, पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, संतोष एलपूलवार, गजानन नागरे, नितीन रायपूरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले यांनी केली.