चंद्रपुरातील त्या दयनीय रस्त्याला आमदार जोरगेवार देणार जीवनदान

त्या रस्त्याचे काम सुरू होणार

News34 chandrapur

 

चंद्रपूर – १ कोटी 80 लक्ष रुपयांच्या विवध विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन मतदार संघातील नागरिकांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज १ कोटी 80 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपुजन संपन्न झाले आहे. हे अतिशय गरजेची कामे होती. यासाठी निधी उपलब्ध करता आला याचे समाधान असुन लोकांना अपेक्षित असलेली विकासकामे पुर्ण होत असल्याचा आनंद आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Mla kishor jorgewar

रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल््हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेख, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, करणसिंह बैस, प्रतिक शिवणकर, शहर संघटक विश्वजित शहा, हेरमन जोसेफ, विनोद अनंतवार, राम जंगम, कुमार जूनमुलवार, बबलु मेश्राम, सतनाम सिंह मिरधा, प्रविण कुलटे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

भूमिपूजन संपन्न झालेल्या कामांमध्ये 40 लक्ष रुपयांचा बिनबा गेट वार्डातील सिमेंट काँक्रिट रोड, 40 लक्ष रुपयांचा बाबुपेठ आंबेडकर प्रभागातील सिमेंट काँक्रिट रोड, लालपेठ येथील 25 लक्ष रुपयांचा सिमेंट काँक्रिट रोड, 50 लक्ष रुपयांचा बागला चौक ते राजिव गांधी इंजिनिअरिंग काॅलेज पर्यंतचा सिमेंट काॅंक्रिट रोड आणि बगड खिडकी परिसरातील 25 लक्ष रुपयांच्या सिमेंट काॅंक्रिट रोडचा समावेश आहे.

सदर भुमिपुजन कार्यक्रमात बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात मोठ्या प्रमाणात आपल्याला यश येत असुन आमदारांना मिळणा-या निधी व्यतिरिक्तही ईतर विभागांमधुन आपण मोठा निधी येथील विकासकामांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. वेगवेगळ्या विभागांमधुन आपण नुकताच 15 कोटी रुपयांचा निधी खेचुन आणला असुन यातुन शहरातील दुर्लक्षित भागांचा विकास केल्या जाणार आहे.
कोरोना काळात अनेक विकास कामे प्रभावित झाली. या परिस्थितही आपण चंद्रपूरच्या विकासकामांची गती कमी होऊ दिली नाही. अगोदर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन मोठा निधी चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी उपलब्ध करुन दिला. आता शिंदे-फडणवीस सरकाच्या माध्यमातुन येथील कामांसाठी निधी उपलब्ध केल्या जात आहे. रोड, नाली यासोबतच विद्यार्थ्यांना नि:शुल्करित्या अभ्यास करता यावा या करिता आपण मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करत आहोत. यातील तीन अभ्यासिकांचे काम जवळपास पुर्ण झाले असुन बाकी अभ्यासिकांचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शहरातील बागला चौक ते राजिव गांधी इंजिनिअरिंग काॅलेज पर्यंतचा मार्ग अतिषय खराब झाला आहे. या मार्गाचे काम करण्यात यावे अश्या अनेक मागण्या आल्या होत्या. मध्यंतरी सदर कामासाठी आपण निधी उपलब्ध केला होता. मात्र राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर या कामासह मंजूर 100 कोटी रुपयांच्या कामांवर स्थगिती आली होती. त्यानंतर आपण या विकासकामांवरील स्थगिती हटविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. याची त्यांनी दखल घेत सदर सर्व विकासकामांवरील स्थगिती हटविली आहे. त्यामुळे आता या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी 1 कोटी 10 लक्ष रुपये मंजुर आहे. यातील पहिल्या टप्यात 50 लक्ष रुपये उपलब्ध झाले आहे. तर दुस-या टप्यातील निधीसाठीही आपले प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले. सदर भुमिपूजन कार्यक्रमांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.