वादळी वारा सुटला, मुलगी घरी निघाली आणि विद्युत खांब पडला

चंद्रपुर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे तांडव

News34 chandrapur

चंद्रपूर/सिंदेवाही – भर उन्हाळ्यात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मागील 3 दिवसापासून हवामानात बदल झाल्याने वादळी वारा व पावसाचे अचानक आगमन झाले.

सिंदेवाही शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील हेटी वार्डात शनिवार 22 एप्रिलला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने रस्त्यावरील झाडे अक्षरशः रस्त्यावर तुटून पडले.

news34 whether

एका ठिकाणी आंब्याचे झाड़ विद्युत खांबावर पडल्याने तो विद्युत खांब मधुनच तुटला, यात जवळच लागुन नरेंद्र राहुलवार यांचे घर आहे. दरम्यान नरेंद्र राहुलवार यांची मुलगी राखी नरेंद्र राहुलवार (१५) ही वातावरण खराब झाल्याने घराच्या आत जात असतांनाच विद्युत खांब तुटून पडला. सुदैवाने तो विद्युत पोल राखीच्या अंगावर पडला नाही. त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे मोठी हानी टळली मात्र, राखी नरेंद्र राहुलवार हीचा डावा पाय तारांमध्ये फसल्याने तिच्या पायाला दुखापत झाली असल्याने ती जखमी झाली आहे.  जवळच असलेल्या सुनील सामुसाखरे यांच्या दुकानावर दूसरे झाड़ पडल्याने सामुसाखरे यांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. शहरातील हेटी वार्डात विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात आला होता.

सिंदेवाही चे तलाठी संदीप पाचभाई, सिंदेवाही वनविभाग व महावितरण विभाग सिंदेवाही यांनी राहुलवार यांच्या घरी भेट देऊन पंचनामा केला.