चंद्रपूर शहरात चारचाकी वाहनांचा भीषण अपघात

चंद्रपूर शहरात अपघात

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील महावितरण कार्यालय बाबूपेठ समोर आज सायंकाळी चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.
या अपघातात काही जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. Big accident in chandrapur

शहरातील बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे सध्या वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
आज सायंकाळच्या सुमारास MH34AM0447 Mahindra Scorpio हे वाहन भरधाव वेगात चंद्रपूर शहराकडे येत होते, मात्र वाटेत त्या वाहनाने 2 गाड्याना धडक दिली.
त्यावेळी समोरून येणारे Renault Triber वाहन क्रमांक MH34CD3227 याला स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की एका वाहनाचे air bags बाहेर निघाले.
सदर वाहन हे बुच्चे व मुंडे यांचे असल्याची माहिती मिळाली आहे, स्कॉर्पिओ या वाहनाचे ब्रेक्स फेल झाले होते, त्यामुळे अनियंत्रित वाहनाने समोरून येणाऱ्या वाहनाला जबर धडक दिली.

अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तात्काळ बाहेर काढत पोलिसांना याबाबत सूचना दिली, स्कॉर्पिओ वाहनातील चालकाने वाहन तिथेच सोडत पळ काढला.
मुंडे यांच्या वाहनात गर्भवती महिला दवाखान्यातून तपासणी करून घरी जात असल्याची माहिती मिळाली.