News34 chandrapur
गोंडपीपरी accident news – 27 मार्चला गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा आष्टी मार्गावर भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. Road accident news
आष्टी व गोंडपीपरी मार्गावरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणारे दुचाकी वाहन क्रमांक MH 40 BU -9878 व MH 34 CB 5972 हे अनियंत्रित होत एकमेकांना धडकले.
धडक इतकी जोरदार होती की दुचाकी चालक काही अंतरावर जाऊन पडले, अपघातात राकेश जधुनाथ अधिकारी वय (30) ठाकुरणगर ता.चामोर्शी,अमोल नैताम मु.बेलगटा चारगाव ता. सावली वय (27) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर नितेश दामोदर कोवे वय (27) मु.चारगाव ता.सावली गंभीर जखमी असून ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीत उपचार सुरू आहे.पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.