News34 chandrapur
बीड – मी नेट ची तयारी करीत होतो काही दिवसांनी कोरोना आला आणि लॉकडाउन लागले, तेव्हा मी गावी आपल्या घरी आलो तेव्हा अक्षय रासकर हे Blogging व Youtube वर काम करीत होते.
त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले असता मी आज माझ्या ब्लॉगर च्या माध्यमातून महिन्याला 1 ते 2 लाख रुपये कमवित आहे, त्यामुळे आज मी त्या पैश्याने लॅपटॉप, आयफोन व घराचे बांधकाम सुद्धा करीत आहे.
He earns 10 lakh rupees per month from blogger
ही कहाणी आहे बीड या दुष्काळग्रस्त भागातील कोळगावातील अक्षय रासकर हा तरुण ब्लॉगर व you tube च्या माध्यमातून महिन्याला 10 लाख रुपये कमवित आहे.
वर्ष 2009 ते 10 या कालावधीत अक्षय ने youtube वर स्वतःचे चॅनेल सुरू केले त्यावेळी blogger ची माहिती घेत स्वतःचे वेब पोर्टल सुरू केले.
आज महिन्याकाठी अक्षय 30 ते 40 हजार डॉलर कमवित आहे, यामधून त्याने जवळपास 300 मुलांना रोजगार दिला.
How to make money online?
आज कोळगाव हे ब्लॉगर्स चे गाव म्हणून ओळखल्या जात आहे, सध्या अक्षय प्रत्येक जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार मुलांना एकत्र करीत ब्लॉगर्स बाबत माहिती देण्याचे काम करीत आहे.
Tips for making money online
अक्षय कडे सध्या बारा वेब पोर्टल आहेत, त्याचबरोबर आमचे 48 ते 50 web portal आहेत, युट्युबचे सहा चॅनल आहेत, हे सर्व काम आम्ही करत आहोत, अशी माहिती अक्षय रासकर यांनी दिली.
Way to make money online
काही दिवसांमध्ये लोकांना एक टिक टॉक किंवा पब्जी खेळायचे वेड लागले होते. त्या ठिकाणावरून लोकांना काही पैसा मिळत नव्हता, मात्र त्यांचा वेळ वाया जात होता, त्या वेळेमध्ये घरचे काम सुद्धा करत नव्हती, त्याचे अनेक दुष्परिणाम आपण पाहिले आहेत. पब्जीच्या नादामध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केले आहेत. त्यावर एक पर्याय म्हणून आम्ही एक वेगळी दुनिया निर्माण केली आहे.