News34 chandrapur
चंद्रपूर – पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात 13 एप्रिल 2019 मध्ये राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली अशी तक्रार भाजप आमदार पुरणेश मोदी यांनी गुजरात येथील सुरत मध्ये दिली.
तक्रारकर्ते पुरणेश मोदी यांनी यांनी गुजरात उच्च न्यायालयात दिलेल्या तक्रारींवर स्थगिती द्यावी अशी मागणी केली, त्यावर कोर्टाने त्या निर्णयाला स्थगिती दिली, मात्र त्यानंतर कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सामान्य नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना देशात सुरू असलेले नकारात्मक स्थितीला घाबरू नका असे आवाहन केले होते.
पंतप्रधान मोदी यांचे मित्र गौतम अडाणी विरोधात राहुल गांधी यांनी आवाज बुलंद करीत दोघांच्या संबंधावर प्रश्न विचारले असता 2019 च्या तक्रारींवर निकाल आला आणि गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावीत त्यांची लोकसभा सदस्यता रद्द करण्यात आली.
आता भाजप शासित केंद्र सरकार देशात हुकूमशाही निर्माण करीत असल्याचा आरोप कांग्रेसचे राज्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
देशात सुरू असलेल्या हुकूमशाही विरोधात कांग्रेस आपला आवाज बुलंद करीत शेवटच्या श्वासापर्यंत लढेल, कांग्रेसवर अन्याय म्हणजे देशातील नागरिकांवर झालेला हा अन्याय आहे, मागील 70 वर्षे आम्ही लोकशाही जपली मात्र केंद्रात भाजप शासन आल्यावर त्यांनी लोकशाहीची हत्या करीत हुकूमशाहीची राजवट आणली.
सरकार विरोधात आज कुणी आवाज उचलला तर त्याला जेल मध्ये टाकण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, आज कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेचि कारवाई करण्यात आली पण त्यांनी लोकशाहीलाचं अपात्र केलं आहे.
भाजपच्या या हुकूमशाहीला कांग्रेस हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, कांग्रेसच्या माध्यमातून आम्ही जनसामान्यांच्या आवाज बुलंद करीत त्यांना सत्तेतून खाली खेचू, राहुल गांधी सुरत कोर्टाच्या निर्णयाला आवाहन देणार का? या प्रश्नावर लोंढे यांनी आगे आगे देखो होता क्या है, असे म्हणत मिश्किल टोला मारला.
पत्रकार परिषदेत खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजूरकर, कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महानगर अध्यक्ष रामू तिवारी, महिला अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, चंदा वैरागडे, अश्विनी खोब्रागडे यांची उपस्थिती होती.