News34 chandrapur
बल्लारपूर शहरांमधील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळावे याकरिता भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन देण्यात आले.
बल्लारपूर एक औद्योगिक शहर आहे ज्यामध्ये पेपर मिल WCL आणि बाकी औद्योगिक कंपन्या स्थापित आहेत ज्या कारणाने शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करून जीवन जगावे लागत आहे.
Pure water
शहरातील अधिकांश नागरिक हे मजूरी व छोटे मोठे कामधंदे करून आपली रोजी रोटी कमवत आहेत. त्यांना दोन वेळेचं जेवण ही मिळणे कठीण होत आहे. अशा मध्ये एकीकडे प्रदूषण मुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, त्यात भर म्हणजे बल्लारपूर जीवन प्राधिकरण पाणी विभाग च्या तर्फे लोकांना जे पाणी दिलं जातं त्याचे नळ बिल मोठ्या रकमेचे येत आहे.
साधारणतः एका परिवारास महिन्याचे 30 यूनिट वीज पाण्यावर खर्च करतो त्याचे बिल जवळपास 800 रुपये येतं जे की खूप जास्त आहे.
काही परिवार हे बिल आर्थिक परिस्थिती कारणास्तव जर भरू नाही तर प्राधिकरण कंपाऊंड व्याज स्वरूपात त्याची वसुली करते हा सरळ सरळ गरीब नागरिकांस लुटण्याचा प्रकार आहे.
पाणीपुरवठा विभाग बल्लारपूर शहर जे नागरिक बिल भरू शकले नाही त्यांचे कनेक्शन डायरेक्ट कट करत आहे जे की असंवैधानिक आहे.
नगरपरिषद बल्लारपूर वर महाराष्ट्र प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपये थकीत आहे नगरपालिका त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही व प्राधिकरण ही गप्प आहे त्याचा परिणाम नागरिकांवर नाहक भुर्दंड बसत आहे. सामान्य जनते कडून अनैतिक, असंविधानिक स्वरूपाची वसुली होत आहे.
त्याचबरोबर ज्या लोकांचे मीटर खराब आहेत त्यांच्याकडून 540 रुपये महिना पाण्याचे बिल येत आहे, जे की फार चुकीचे आहे कारण त्यांनी त्याचा वापरच नाही केला तर त्याचे बिल कसे देणार?
यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडने मागणी केली की प्रत्येक परिवाराला पंधरा मिनिटे पाणी फ्री मध्ये दिले पाहिजे आणि पंधरा मिनिटाच्या वरती प्रती युनिट दहा रुपये वसूल केले पाहिजे. वीज नळबिलावरती जी व्याज लावण्याची प्रथा चालू केलेली आहे ती बंदच व्हायला हवी.
आणि नवीन कनेक्शन घेताना नागरीकांना सुरक्षा रक्कम च्या नावाखाली जे 1500 रुपये भरण्याची अट ठेवलेली आहे ती कमी करून 500 रुपये करण्यात यावी.
पाणी हे मूलभूत गरजा पैकी आहे व स्वच्छ व मोफत पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. तेव्हा शासनाने या विषयाला गंभीरतेने घेवून ह्या विषयाचे ताबडतोब निराकरण करावे अशी मागणी डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र ब्रिगेडमधील सदस्य व नागरिकांना तहसीलदार बल्लारपूर यांना केली आहे.