News34chandrapur गुरू गुरनुले
मूल – मुल तालुक्यात काल झालेल्या आकस्मिक अवकाळी वादळ वारा अकाली पावसामुळे घराचे टीनचे छत उडून मोठया प्रमाणात नुकसान झाले.ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली. मुल तालुक्यातील १२ किलो मिटर अंतरावर असलेल्या टोलेवाही, चिरोली आणि कांतापेठ येथे घडली.
यात तीन घरांचे छत उडून भिंती खचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराचे पूर्ण छत उडाल्याने सध्यस्थितीत बेघर होण्याची पाळी आली आहे. त्यांना तात्काळ राहण्याची सोय आणि आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी केले आहे. चंद्रपुरातील क्रिकेट सट्टेबाज आधुनिक मार्गदर्शनासाठी जेव्हा दुबई पोहचले
सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला.आणि अवकाळी वादळ वारा सह तुफानी जोरदार पाऊस कोसळला.त्यात टोलेवाही,चिरोली आणि कांतापेठ येथील प्रत्येकी तीन घरांचे मोठे नुकसान झाले.चिरोली येथील शामराव सुधाकर मोहूर्ले यांच्या घराचे वरचे सिमेंटचे छत लोखंडी एंगलसह जोरदार वादळ वा-यांमुळे संपूर्ण पणे उडून गेले.पावसामुळे भिंत खचल्याने दोन खोलीतील भांडीकुंडी आणि इतर सामानांची मोठी नुकसान झाली.घरातील सामान पावसामुळे भिजल्यामुळे त्यांच्या पुढे मोठी समस्या निर्माण झाली. भिंतीवरची वीट पडल्याने यांच्या घरातील एका मुलीला किरकोळ मार बसला.
अशाच पदधतीचे नुकसान टोलेवाही येथील क्रिष्णा गद्येकार आणि कांतापेठ येथील एका घराचे नुकसान झाले आहे. तीनही ठिकाणी संबंधित तलाठयांनी पंचनामा केला.
राहण्याचा निवाराच उघडा पडल्याने त्यांना राहण्याची सोय करावी आणि आर्थिक नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी मुल तालुका प्रशासनाकडे येथील माजी पंचायत समिती सदस्या वर्षाताई लोनबले यांनी केली आहे.