चंद्रपुरातील क्रिकेट सट्टेबाजांची दुबईवारी

सिराज ची साथ राजीक, महेश झाले मालामाल

 

News34 chandrapur

चंद्रपूर – देशात जुगार प्रतिबंधित असला तर आज ऑनलाइन च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळला जात आहे.

 

यासाठी Android app dream11, my11 circle, 1xbet, nice7777, teen patti, rummy असे अनेक app ऑनलाइन माध्यमांवर सहज उपलब्ध होतात, ऑनलाइन app द्वारे पैसे लावणे व जिंकल्यावर काढण्याची सुविधा उपलब्ध होते, आज अनेक वृत्तपत्र, ऑनलाइन माध्यन्मावर जुगारांच्या जाहिराती बघायला मिळत आहे.चंद्रपुरात सावकारीच्या आड क्रिकेट सट्टा

 

आपल्या देशात जी वस्तू प्रतिबंधित आहे ती सहज कुठेही उपलब्ध होते असाच हा एक प्रकार आहे.

सध्या देशात IPL T20 क्रिकेट चा 16 वा हंगाम सुरू झाला आहे, क्रिकेटच्या महासंग्रामात खेळाडूंना मॅच खेळण्यासाठी चांगला मोबदला दिला जातो, त्यामुळे आज क्रिकेट मध्ये चांगले खेळाडू बघायला मिळत आहे.

 

मात्र एकीकडे खेळाडूंना कोट्यवधी रुपये तर दुसरीकडे हजारो कोट्यवधी रुपयांची उधळण होताना दिसत आहे, क्रिकेट मॅच च्या माध्यमातून क्रिकेट बुकींचे मोठे नेटवर्क सध्या सक्रिय आहे, ऑनलाइन app वर id बनवून त्यामध्ये दररोज क्रिकेट वर लाखो रुपये अनेक शौकीन उधळत असतात. IPL T20 2023 हे आहे चंद्रपुरातील IPL सट्टेबाज

 

चंद्रपुरातील राजीक व महेश यांनी या अवैध जुगाराला चालना देण्याचे काम सुरू केले, त्यानंतर दोघांनी हा धंदा संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढविला, ऑनलाइन क्रिकेट जुगार खेळण्यासाठी राजीक व महेशला सिराज ची साथ मिळाली.

 

त्यानंतर सिराज, राजीक व महेश हे पोलिसांना न घाबरता आजही राजरोसपणे ऑनलाइन अवैध जुगाराचा धंदा वाढवीत आहे. Indian Premiere league 2023

पोलीस वाले अपना कुछ बिगाड नही सकते असे या तिघांचे ब्रीदवाक्य आहे, ते खरे पण आहे कारण या दोघांवर कारवाई करण्याची हिंमत गडचिरोली पोलिसांनी दाखवली होती, sdpo अमोल ठाकूर यांनी गडचिरोली ते नागपूर असे सट्टेबाजांचे नेटवर्क उध्वस्त करून टाकले होते.

 

त्यामुळे आजही चंद्रपूरात पोलिसांना न घाबरता हे काम सतत सुरू आहे, राजीक व महेश यांनी जिल्ह्यात 32 बुकींचे नेटवर्क उभे केले आणि चंद्रपूर जिल्ह्यातून 200 ते 300 कोटी रुपयांचा धंदा नागपुरातील सिराज ला देण्याचे काम दोघे अनेक वर्षांपासून करीत आहे.

 

दोघांच्या कामाला खुश होऊन सिराज ने महेश व राजीक यांनी दुबई वारी घडविली, या धंद्याचे मुख्य कार्यालय दुबई मध्ये स्थित आहे, त्या ठिकाणाहून ऑनलाइन च्या माध्यमातून हा अवैध जुगार सुरू आहे, दोघांना दुबई मध्ये ऑनलाइन जुगारात काय नवीन क्रांती आली त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. Online cricket betting app

 

दुबई वरून परत आल्यावर दोघांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली, ऑनलाइन क्रिकेट जुगारांच्या माध्यमातून दोघांनी नवे धंदे सुरू केले आहे, पण IPL सारखा सण आला की पुन्हा कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करण्यासाठी दोघेही त्यामध्ये गुंतून जातात.

 

चंद्रपूर सहित संपूर्ण राज्यात ऑनलाइन क्रिकेट जुगाराचे मोठे नेटवर्क सिराज ने महेश व राजीक सारख्या पंटर ला सोबत घेत उभे केले, व आपल एक नवे जग स्थापन केले.

 

सिराज वर कारवाई का नाही?

 

सिराज ने या अवैध जुगारामुळे कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे, मी पोलिसांना घाबरत नाही, ते माझं काही बिघडवू शकत नाही, कधी कारवाई झाली तर मी ते प्रकरण तात्काळ मिटवू शकतो अशी सिराज ची भूमिका.

 

राजीक व महेश सुद्धा सिराज च्या पाऊलावर पाऊल टाकत त्याचं ब्रीदवाक्याचे पालन करतात, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या ऑनलाइन जुगार केंद्रावर कारवाई केल्यास अनेक मोठे नाव पुढे येणार व चांदा ते बांद्या पर्यंत हे नेटवर्क उधळण्याची महत्वपूर्ण कामगिरी पोलिसांनी बजवावी अशी नागरिक मागणी करीत आहे.

 

कारण या अवैध जुगारामुळे अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली असून अनेकांनी कर्जपायी आत्महत्या सुद्धा केली आहे.