क्रिकेट सट्टा – 2 बुकीसह 6 जणांना पोलिसांनी केली अटक

IPL चा सट्टेबाजार

News34 chandrapur

अमरावती – तरुणांना IPL क्रिकेट सट्टा चे वेड लावून online जुगार खेळण्यासाठी परावृत्त करणारे 2 बुकींना अमरावती येथील परतवाडा मध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 6 जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून मोबाईल सह 72 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Indian premier league

 

सध्या इंडियन प्रीमिअर लीग चे सामने सुरू असून त्यावर दररोज लाखोंचा सट्टा लावल्या जात आहे, हा सर्व सट्टा ऑनलाइन app च्या माध्यमातून खेळला जातो हे विशेष.

 

याबाबत अमरावती ग्रामीण पोलिसांना काही तरुण स्वतःच्या मोबाईल मधून ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी 19 वर्षीय आयुष हरदे, 22 वर्षीय निकुंज खंडेलवाल, लक्ष्मण जिचकार व किशोर फणसे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 5 मोबाईल, 4 हजार 530 रुपये रोख असा एकूण 72 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

हा ऑनलाइन सट्टा संकेत शेळके व राम शर्मा हे दोघेही भागीदारी मध्ये चालवीत होते, पोलिसांनी दोघांचा शोध घेत अटक केली आहे, सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व मनोज कदम यांनी केली.

 

चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा 1 नाही तर तब्बल 32 जण हा सट्टा ऑनलाइन पद्धतीने घेतात, तरुणांना user id व पासवर्ड देत लाखो रुपये एका मॅच वर खेळले जातात.

पण चंद्रपूर पोलिसांनी या सट्टेबाजांवर अजूनही कारवाई का केली नाही यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, चंद्रपुरातील सट्टेबाज म्हणतात आमचं कुणी वाकडं करू शकत नाही.