News34 chandrapur
चंद्रपूर/नागभीड – चारही बाजूने वन क्षेत्राने आच्छादलेल्या जिल्ह्यात मोहफुलाचा हंगाम सुरू झाला असून अनेक नागरिक जंगल भागात मोहफुल वेचण्याकरिता जात आहे, मात्र त्या ठिकाणी वाघाचं वास्तव्य असल्याने कुणीही वाघांची शिकार होऊ शकते.
4 एप्रिलला मंगळवारी नागभीड येथील गट क्रमांक 605 मध्ये दुपारच्या सुमारास गावातील एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले. Tiger attack
55 वर्षीय अरुण महादेव रंध्ये असे मृतकाचे नाव असून तो सकाळी गावाजवळील जंगलात मोहफुल वेचण्याकरिता गेला होता, मोहफुल वेचत असताना अचानक अरुण वर वाघाने हल्ला चढविला या हल्ल्यात अरुणचा मृत्यू झाला.
बराच वेळ झाल्यावर अरुण घरी परतला नसल्याने कुटुंबियांने त्याचा सर्वत्र शोध घेतला असता जंगलात अरुण चा मृतदेह गावकऱ्यांना आढळला, याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असता वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
Tendu leaf collection
मोहफुलाच्या हंगामवेळी आता तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होणार असून पुन्हा मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढणार असा अंदाज वर्तविल्या जात आहे.